केज (बीड) -येथील उपजिल्हा रुग्णालया समोर एका वृद्ध महिलेच्या डोक्यावरून एसटीचे मागचे चाक गेल्यामुळे तिचा तिचा जागीच मृत्यू झाला आहे. काशीबाई रामभाऊ थोरात (वय 65 वर्षे), असे मृत महिलेचे नाव आहे.
केज उपजिल्हा रुग्णालयासमोर बसखाली चिरडून महिलेचा मृत्यू - बीड जिल्हा बातमी
केज उपजिल्हा रुग्णालयासमोर बसखाली चिरडून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे.
मृत काशीबाई
यबाबत सविस्तर वृत्त असे, मंगळवारी (दि. 2 फेब्रु.) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास काशीबाई या रिक्षातून आपल्या गावाकडे जात होत्या. त्याच दरम्यान उपजिल्हा रुग्णालयासमोर रिक्षातून तोल जाऊन त्या रिक्षाबाहेर पडल्या. याचवेळी बीड आगाराची अंबाजोगाई-बीड शिवशाही बस (क्र. एम एच 09 एफ एल 1042) आली. बसखाली चिरडून काशीबाई यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा -जिल्हा नियोजन बैठकीमध्ये 336 कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी