महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चारचाकी पलटी होऊन अपघात, एकाचा मृत्यू - Accident in Ambejogai

किनगाव - अंबेजोगाई रोडवर चारचाकी पलटी होऊन अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. मोहंगाव फाट्याजवळ हा अपघात झाला. सूर्यकांत निवृत्ती सिरसाट असं या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

चारचाकी पलटी होऊन अपघात, एकाचा मृत्यू
चारचाकी पलटी होऊन अपघात, एकाचा मृत्यू

By

Published : Apr 20, 2021, 10:44 PM IST

बीड -किनगाव - अंबेजोगाई रोडवर चारचाकी पलटी होऊन अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. मोहंगाव फाट्याजवळ हा अपघात झाला. सूर्यकांत निवृत्ती सिरसाट असं या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

उपचारासाठी नेताना रस्त्यात मृत्यू

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सूर्यकांत सिरसाट (वय ४०) हे आपल्या चारचाकीने जात असताना, अंबेजोगाई रोडवरील मोहंगाव फाट्याजवळ त्यांचे चारचाकीवरील नियंत्रण सुटले व गाडी पलटी झाली. या अपघातामध्ये सूर्यकांत सिरसाट हे गंभीर जखमी झाले होते, त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासठी अंबेजोगाईला हलवण्यात येणार होते, मात्र गंभीर जखमी झाल्याने वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा -भारत बायोटेककडून लसनिर्मिती क्षमतेत 20 कोटींनी वाढ

ABOUT THE AUTHOR

...view details