बीड - टाटा सुमो कार पलटी होऊन १ जण ठार झाल्याची घटना मांजरसुंब्याच्या घाटाजवळ घडली. चालकाचे नियत्रंण सुटल्याने हा अपघात झाला असून, यामध्ये २ जण गंभीर जखमी झाले आहेत.
बीडमध्ये कार पलटी होऊन १ जण ठार तर २ जण गंभीर - tata sumo car
टाटा सुमो कार पलटी होऊन १ जण ठार झाल्याची घटना मांजरसुंब्याच्या घाटाजवळ घडली. चालकाचे नियत्रंण सुटल्याने हा अपघात झाला. यामध्ये २ जण गंभीर जखमी झाले आहेत.
विक्रांत मोराळे, सय्यद आबेद हसन आणि निहाल शेख हे बीड शहरातील बालेपीर भागामधील रहिवाशी आहेत. गुरुवारी रात्री हे ३ मित्र टाटा सुमो (क्र.एमएच २३ एडी २३७०) मधून जेवन करण्यासाठी मांजरसुंबा घाटाजवळ असलेल्या हरियाणा ढाब्यावर गेले होते. जेवण झाल्यानंतर हे तिघेही मांजरसुंब्याकडे जात होते. याच वेळी चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कारने ३ पलटी घेतल्या.यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता विक्रांत मोराळेचा मृत्यु झाला. तर सय्यद आबेद हसन आणि निहाल शेख या अपघातात गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.