महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीडमध्ये कोरोनाचा एक नवा रुग्ण; एकूण रुग्णसंख्या 63 वर - beed covid 19 hospital

बीड जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 63 वर जाऊन पोहोचली आहे. शनिवारी रात्री उशिरा 10 पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज दिला आहे. नागरिकांनी घराच्या बाहेर पडल्यानंतर सोशल डिस्टन्स ठेवावे, असे आवाहन बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी केले आहे.

बीडमध्ये 38 पैकी 37 निगेटिव्ह तर 1 आढळला कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या 63 वर
बीडमध्ये 38 पैकी 37 निगेटिव्ह तर 1 आढळला कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या 63 वर

By

Published : May 30, 2020, 11:48 PM IST

बीड - येथील जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने पाठवलेल्या 38 नमुन्यांपैकी 37 अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर 1 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. ही कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील डोंबरी येथील आहे. बीड जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 63 वर जाऊन पोहोचली आहे. शनिवारी रात्री उशिरा 10 पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज दिला आहे. नागरिकांनी घराच्या बाहेर पडल्यानंतर सोशल डिस्टन्स ठेवावे, असे आवाहन बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी केले आहे.

बीड जिल्ह्यात मजुरांचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असते. याचाच परिणाम पुणे आणि मुंबई येथून बीड जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याचा परिणाम म्हणून बीड जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 63 वर पोहोचली आहे. शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला रुग्ण हा 38 वर्षाचा असून, मुंबई येथून तो पाटोदा तालुक्यातील डोंबरी येथे आला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details