महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पैसे न दिल्याच्या रागातून खून, अंबाजोगाई तालुक्यातील धक्कादायक घटना - बीड जिल्हा क्राईम न्यूज

पुतण्यानेच चुलत्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूरमध्ये घडली आहे. चुलत्याने वडिलांना खर्चासाठी पैस न दिल्याने रागाच्या भरात आरोपीने चुलत्याची हत्या केली. अर्जुन उर्फ दादा दत्तात्रय धोंगडे असे या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पैसे न दिल्याच्या रागातून खून
पैसे न दिल्याच्या रागातून खून

By

Published : Jan 5, 2021, 6:52 PM IST

बीड-पुतण्यानेच चुलत्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूरमध्ये घडली आहे. चुलत्याने वडिलांना खर्चासाठी पैस न दिल्याने रागाच्या भरात आरोपीने चुलत्याची हत्या केली. अर्जुन उर्फ दादा दत्तात्रय धोंगडे असे या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पैसे दिले नाही म्हणून हत्या

जनार्दन मुंजाजी धोंगडे (वय ५५, रा. घाटनांदूर, ता. अंबाजोगाई) असे मृत चुलत्याचे नाव आहे. जनार्दन धोंगडे हे आठवडी बाजारात जाऊन चप्पल, बूट विक्रीचा छोटा व्यवसाय करून उदरनिर्वाह करत होते. पुतण्या अर्जुन उर्फ दादा दत्तात्रय धोंगडे (वय २८) हा त्यांच्याकडे सोमवारी आला आणि माझ्या वडिलांना खर्चासाठी पैसे द्या म्हणू लागला. जनार्दन यांनी नकार देताच रागात येऊन बडबड करत निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी जनार्दन हे व्यवसायासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी गंगाखेडला गेले. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ते गावत परतले आणि घराकडे निघाले. ते घरासमोर येताच अर्जूनने त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात जनार्दन धोंगडे हे गंभीर जखमी झाले.

उपचारादरम्यान जनार्दन यांचा मृत्यू

जनार्दन यांची मुलगी वैशाली वडिलांना वाचविण्यासाठी आरडाओरडा करू लागली, तर अर्जुन तिच्यावर आणि इतर लोकांवरही धावून जावू लागला. अखेर जमाव वाढल्यानंतर अर्जुन तिथून निघून गेला. वैशालीने इतर लोकाच्या मदतीने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वडिलांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केले. उपचारादरम्यान जनार्दन यांचा मृत्यू झाला. मुलीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला असून, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details