महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाशिवरात्रीसाठी परळी सज्ज; देशभरातील लाखो भाविक वैद्यनाथांचे घेणार दर्शन - mahashivratri beed

२१ फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे. त्यामुळे, सुरक्षेच्या दृष्टीकोणातून परळी शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. महाशिवरात्री निमित्ताने परळीत अनेक वर्षांपासून यात्रा भरते. या यात्रेनिमित्त देशभरातील विविध भागातून लाखो भाविक येथे दाखल होतात. महाशिवरात्रीची पूर्वतयारी वैद्यनाथ देवल कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे.

deval committee beed
महाशिवरात्री उत्सव

By

Published : Feb 20, 2020, 10:23 AM IST

बीड- महाशिवरात्रीच्या उत्सावानिमित्त प्रभू वैद्यनाथांच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक परळीत दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर देवल कमिटीकडून मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली असून विद्युतरोषणाई देखील केली आहे. भाविकांना दर्शन घेण्यासाठी अडथळा निर्माण होऊ नये यासाठी बॅरिकेड्स, देखील उभारले आहेत. शिवाय यात्रेदरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ३५० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

२१ फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे. त्यामुळे, सुरक्षेच्या दृष्टीकोणातून परळी शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. महाशिवरात्री निमित्ताने परळी येथे अनेक वर्षांपासून यात्रा भरते. या यात्रेनिमित्त देशभरातील विविध भागातून लाखो भाविक येथे दाखल होतात. महाशिवरात्रीची पूर्वतयारी वैद्यनाथ देवल कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे. या निमित्ताने मंदिर व परिसरात रंगरंगोटी, दर्शन व्यवस्था आदी विविध कामे पूर्ण झाली असून परळी शहर गर्दीने फुलले आहे.

महाशिवरात्रीनिमित्त देवल कमिटीकडून पारंपरिक तीन दिवसांचा उत्सव साजरा केला जातो. यामध्ये पालखी सोहळा असतो. महाशिवरात्री पर्वकाळात दर्शनासाठी देशभरातील विविध ठिकाणांहून लाखो भाविक मंदिरात येतात. भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी मंदिर प्रशासनाकडून मंदिरात आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. भाविकांच्या सोयी सुविधांसाठी देवल कमिटी प्रयत्न करीत आहे, असे देवल कमिटीचे सचिव राजेश देशमुख यांनी सांगितले.

असे आहेत अध्यात्मिक कार्यक्रम

२१ फेब्रुवारीला महाशिवरात्री असल्याने वैद्यनाथ मंदिरात हजारों भाविकांना दर्शन घेणे सुलभ व्हावे म्हणून धर्म दर्शनमध्ये पुरुष व महिलांच्या स्वतंत्र रांगा लावण्यात येणार आहेत. २१ फेब्रुवारीला रात्री ६ ते ८ या वेळेत वैद्यनाथ विश्वस्त कमिटीच्यावतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते रुद्राभिषेक करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अभिषेकानंतर भाविकांना अभिषेक करण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. २२ फेब्रुवारी रोजी परिसरातील सर्व शिव भक्तांसाठी दर्शन मंडप येथे महाप्रसादाची व्यवस्था दुपारी १२ ते ४ च्या दरम्यान करण्यात आली आहे.

त्याचबरोबर, २३ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता श्री. वैद्यनाथाची पालखी सवाद्य मिरवणुकीने निघेल. सायंकाळी ६ वाजता देशमुख पाराजवळ सुप्रसिद्ध गायक पंडित धनंजय म्हसकर व प्राजक्ता काकतकर (रा. मुंबई) यांचा भक्तीगीत व अभंगवाणीचा कार्यक्रम होणार आहे. अंबवेस येथे रात्री ९ वाजता शोभेची दारू उडविण्यात येईल. त्यानंतर गणेशपार, नांदूरवेस, गोपनपाळे गल्ली येथे कलावंताची हजेरी होईल. नंतर अंबवेस, भोईगल्ली मार्गे रात्री मिरवणुकीने पालखी मंदिरात परत येईल. २४ फेब्रुवारीला सकाळी १० ते १ च्या सुमारास वैद्यनाथ मंदिरात मानाची बिदागी वाटपाचा कार्यक्रम होईल. याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा परळीचे तहसीलदार डॉ. विपिन विलासराव पाटील व सचिव राजेश भाऊसाहेब देशमुख आणि विश्‍वस्त मंडळाने केले आहे.

हेही वाचा-परळीत व्यापाऱ्याला मारहाण, धनंजय मुंडे म्हणाले...

ABOUT THE AUTHOR

...view details