बीड- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या एका शासकीय अधिकाऱ्याला काळे फासण्यात आले आहे. हा प्रकार बीड पंचायत समितीच्या आवारात सोमवारी दुपारी घडला. फेसबुकवर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अंगावर संतप्त महिला शिवसैनिकांनी शाई फेकत तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न केला.
महिला शिवसैनिकांनी अधिकाऱ्यावर ओतली शाई हेही वाचा -आमदार प्रकाश सोळंके राजीनाम्याच्या तयारीत; मंत्रिपद डावलल्याने नाराजी कायम
बीड पंचायत समितीतील विस्तार अधिकारी सुनील कुलकर्णी यांनी फेसबुकवर वादग्रस्त टिप्पणी (कमेंट) केली होती. त्याच्या निषेधार्थ शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख अॅड. संगिता चव्हाण यांनी कार्यालयात जाऊन कुलकर्णी यांच्या अंगावर शाई फेकली. एवढेच नाही तर सुनील कुलकर्णी यांच्या तोंडाला काळे फासण्याचा देखील प्रयत्न केला.
हेही वाचा -बीडमध्ये खासगी बसला आग; चालकाच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवासी सुखरूप
तसेच इथून पुढे ठाकरे सरकारबद्दल अपशब्द काढला, तर याद राख, असा सज्जड दम देखील दिला. बीड पंचायत समितीच्या आवारात झालेल्या या प्रकाराची सध्या बीड जिल्ह्यात सर्वत्र चर्चा सुरू आहे. सोमवारी सभापती निवडीसाठी लोकांनी पंचायत समितीमध्ये गर्दी केली होती. त्यातच हा प्रकार घडल्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला.