बीड -लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या प्रीतम मुंडे यांनी पूर्णा येथील सदनिकाची (घर) माहिती घोषणापत्रात दिली नाही. या शिवाय वैद्यनाथ बँकेप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याची माहिती लपवली असल्याचा आक्षेप शेतकरी संघटनेचे कालिदास आपेट यांनी निवडणूक निर्णय अधिकारी अस्तिक कुमार पांडे यांच्याकडे केला आहे. या आक्षेपावर आज सांयकाळी चार वाजता नर्णय होणार आहे.
प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप; वैद्यनाथ बँकेवरील गुन्ह्यांची माहिती लपवण्याचा आरोप - प्रीतम मुंडे
लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या प्रीतम मुंडे यांनी पूर्णा येथील सदनिकाची (घर) माहिती घोषणापत्रात दिली नाही. या शिवाय वैद्यनाथ बँकेप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याची माहिती लपवली असल्याचा आक्षेप शेतकरी संघटनेचे कालिदास आपेट यांनी केला आहे.
कालिदास आपेट यांनी आक्षेप अर्जात म्हटले आहे की, प्रीतम मुंडे यांनी दोन लोकसभा मतदारसंघात मतदार म्हणून नाव नोंदवले आहे. त्यामध्ये दक्षिण मुंबई व परळी विधानसभा मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघात त्यांचे मतदार यादीमध्ये नाव आहे. दोन मतदारसंघात नाव नोंदवणे प्रतिनिधी कायदा लोकप्रतिनिधी कायदा १९५१ प्रमाणे गंभीर गुन्हा असल्याचे आक्षेपकर्त्याने म्हटले आहे.
तीन पानाच्या अक्षेप अर्जावर निवडणूक निर्णय अधिकारी निर्णय देतात हे पाहण्यासाठी थोडा वेळ जावा लागणार आहे. लोकसभा उमेदवारी अर्ज छाननीचा आजचा शेवटचा दिवस आहे.