परळी (बीड) -मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या विरोधात बीडमधील परळी कोर्टाने अटक वॉरंट बजावला ( Non-Bailable Warrant Against Raj Thackeray ) आहे. जामीन करुनही सतत तारखांना गैरहजर राहिल्याने अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला आहे. 2008 साली मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परळीमध्ये राज्य परिवहन मंडळाच्या बसेसवर दगडफेक केली होती. या प्रकरणी कोर्टात केस सुरु आहे.
काय आहे प्रकरण?
22 ऑक्टोंबर 2008 रोजी राज ठाकरे यांना मुंबई येथे अटक केल्यामुळे परळी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध म्हणून सार्वजनिक परिवहन महामंडळाच्या बसेवर धर्मापुरी पाईंन्टवर परळी येथे बेकायदेशीर जमाव जमवुन दगडफेक करून बसचे समोरील काच फोडुन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले प्रकरणी त्यास राज श्रीकांत ठाकरे यांनी चिथावणी दिली मजकुरावर परळी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये राज ठाकरे व त्यांचे कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल गु.रं.नं 208/2008अन्वये गुन्हा कलम 143, 427, 336, 109 भा. दं. वि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.