महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 4, 2021, 12:28 PM IST

ETV Bharat / state

राजकीय स्वार्थासाठी समाजाला वेठीस धरु नये, मराठा संघटनांची भूमिका

मराठा आरक्षणाचा प्रश्न केंद्राच्या अखत्यारीत असल्याने, बीडमध्ये मोर्चा काढून काही साध्य होईल असे वाटत नसल्याचे दाधिकार्‍यांनी सांगितले. मराठा समाजाच्या नावाखाली होणारे राजकारण समाजाने ओळखले आहे. त्यामुळे कोणीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये, केंद्र सरकारने वटहुकूम काढून आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. राज्य सरकारनेही आरक्षणासाठी पूरक भूमिका घ्यावी, अशी मागणी याचिकाकर्ते राजेंद्र दाते पाटील व किशोर चव्हाण यांनी या बैठकी दरम्यान केली.

मराठा आरक्षण प्रश्न  चर्चा
मराठा आरक्षण प्रश्न चर्चा

बीड- कित्येक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी संघर्ष करत आहे. आजवर मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर अनेकांनी राजकारण केले आहे. प्रत्यक्षात मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलेले नाही. परंतु आता समाज सजग होत आहे. या प्रश्नावर राजकारण न करता आरक्षण देण्यासाठी भूमिका घेणे गरजेचे आहे. असे मत मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केले.

संघटनांच्या बैठकीत झाली चर्चा

विविध मराठा समाज संघटनांची बैठक

बीड येथे गुरुवारी विविध मराठा समाज संघटनांची बैठक झाली. यामध्ये संघटनेचे संस्थापक किशोर चव्हाण, शिवबा संघटनेचे अध्यक्ष मनोज जरांगे, शिवक्रांती युवा परिषदेचे संस्थापक गणेश बजगुडे, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे, भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पवळ, छावा क्रांतीवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल चाळक, छावा मराठा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी ठोंबरे आदींची उपस्थिती होती. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर ही चिंतन बैठक झाली.

मराठा आरक्षणाचा प्रश्न केंद्राच्या अखत्यारीत

मराठा आरक्षणाचा प्रश्न केंद्राच्या अखत्यारीत असल्याने, बीडमध्ये मोर्चा काढून काही साध्य होईल असे वाटत नसल्याचे पदाधिकार्‍यांनी सांगितले. मराठा समाजाच्या नावाखाली होणारे राजकारण समाजाने ओळखले आहे. त्यामुळे कोणीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये, केंद्र सरकारने वटहुकूम काढून आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. राज्य सरकारनेही आरक्षणासाठी पूरक भूमिका घ्यावी, अशी मागणी याचिकाकर्ते राजेंद्र दाते पाटील व किशोर चव्हाण यांनी या बैठकी दरम्यान केली.

मोर्चा केवळ हट्टापायी

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी खरे प्रयत्न करायचे असतील तर कायदेशीर बाबी महत्त्वाच्या ठरतात. परंतु बीड मध्ये आमदार विनायक मेटे केवळ राजकीय स्वार्थापोटी राज्य सरकारवर टीका करत, शिवस्मारक समितीचे अध्यक्षपद पदरात पाडून घेतले. मात्र स्मारकाची एक तरी वीट त्यांनी रचली का? असा सवाल उपस्थित करत गणेश बजगुडे यांनी आमदार विनायक मेटे यांच्यावर जोरदार टीका केली. आमदार विनायक मेटे कोरोनाची बिकट परिस्थिती असताना देखील हा मोर्चा काढून आपल्या समाज बांधवांचे जीव धोक्यात टाकत आहेत. असा आरोपही यावेळी बजगुडे यांनी केला.

हेही वाचा-मराठा आरक्षणा बाबद अशोक चव्हाणांची भूमिका दुतोंडी..! - आशिष शेलार

ABOUT THE AUTHOR

...view details