महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परळीत पंचायत समिती सभापतींच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर - उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे

परळी पंचायत समिती सभापती उर्मिला शशिकांत गित्ते यांच्या विरोधात गुरुवारी अविश्वास ठराव बहुमताने मंजुर झाला आहे. यादरम्यान उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांनी पिठासीन अधिकारी म्हणुन काम पाहिले.

पंचायत समिती परळी
पंचायत समिती परळी

By

Published : Jan 7, 2021, 6:31 PM IST

बीड - परळी पंचायत समिती सभापती उर्मिला शशिकांत गित्ते यांच्या विरोधात गुरुवारी अविश्वास ठराव बहुमताने मंजुर झाला आहे. यादरम्यान उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांनी पिठासीन अधिकारी म्हणुन काम पाहिले. समितीमध्ये एकूण 11 पंचायत समिती सदस्य आहेत. त्यापैकी 4 भाजप, 1 माकप तर उर्वरित 6 पंचायत समिती सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. विशेष म्हणजे भाजपच्या पंचायत समिती सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून आपली मते नोंदवली आहेत. परळी पंचायत समितीमध्ये अविश्वास ठरावाच्या निमित्ताने मुंडे बहीण- भाऊ एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होत आहे.

भाजपच्या दोन सदस्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना मदत-

परळी पंचायत समिती सदस्यांनी सभापती उर्मिला शशीकांत गित्ते यांच्या विरुध्द अविश्वास जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केला होता. त्या अनुशंगाने गुरूवारी परळी तहसील कार्यालयात पंचायत समिती सदस्यांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला पंचायत समिती 11 पैकी 10 सदस्स हजर होते. तर उर्मिला गित्ते या स्वःता गैरहजर असल्याने 10 हजर सदस्यांनी सभापतींविरुध्द अविश्वास ठरावाच्या बाजुने हात उभे करुन मतदान केले. त्यामुळे सभापती विरुध्द ठराव मंजुर झाला आहे. इतर वेळी राजकीय आखाड्यात विरोधात असणारे मुंडे बहीण- भाऊ या अविश्वास प्रकरणात मात्र एकत्र आल्याचे दिसून आले. भाजपच्या दोन सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना मदत करीत गित्ते यांच्यावरील अविश्वास ठरावाच्या बाजूने मदत केली. यामुळे परळीत एक नवे समीकरण पाहायला मिळाले.

पोलीस बंदोबस्तात पार पडली बैठक-

मागील आठवडाभरापासून परळी पंचायत समिती मध्ये उलटापालट होण्याच्या हालचाली छुप्या पद्धतीने सुरू होत्या. अखेर गुरुवारी सभापती यांच्याविरोधात अविश्वास ठराव पास झाला आहे. यादरम्यान शहरातील विविध भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हेही वाचा-एसईबीसी अंतर्गत राज्यात लवकरच पोलीस भरती प्रक्रिया- गृहमंत्री

ABOUT THE AUTHOR

...view details