महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संतापजनक.. नवविवाहितेच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळले; पती,सासूला अटक - Rituja Bhaskar Burning death case Beed

ऋतुजाला तिच्या सासू व पतीकडून छळले जात होते. मात्र, मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास ऋतुजाच्या सासरच्यांनी तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवले. या घटनेत ती ९९ टक्के भाजली होती. या घटनेनंतर ऋतुजाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मंगळवारी रात्री उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

beed
बडवणी पोलीस ठाणे

By

Published : Dec 4, 2019, 10:12 AM IST

बीड- कौटुंबिक वादावरून सासरच्यांनी नवविवाहितेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जाळले. ही घटना मंगळवारी रात्री वडवणी तालुक्यातील साळींबा येथे घडली. विवाहितेचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे महिलांवरील अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालल्याचे दिसून येत आहे.

ऋतुजा भास्कर बिटे (वय.१९, रा. साळींबा) असे मृत विवाहितेचे नाव आहे. ८ महिन्यापूर्वी ऋतुजाचा विवाह तिच्या आत्याचा मुलगा भास्कर बिटे याच्याशी झाला होता. लग्नानंतर सतत घरामध्ये कौटुंबिक वाद व्हायचा. यात ऋतुजाला तिच्या सासू व पतीकडून छळले जात होते. मात्र, मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास ऋतुजाच्या सासरच्यांनी तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवले. या घटनेत ती ९९ टक्के भाजली होती. या घटनेनंतर ऋतुजाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मंगळवारी रात्री उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

तत्पूर्वी सकाळी वडवणीचे तहसीलदार अहेमद खमरोद्दीन यांच्या उपस्थितीत वडवणी ठाण्याचे सहायक निरीक्षक महेश टाक यांनी तिचा मृत्यूपूर्वी जाब नोंदविला. यावेळी कौटुंबिक कारणावरून पती भास्कर बिटे व सासू रुक्मिणी बिटे यांनी आपल्याला पेटविल्याचे ऋतुजानी संगितले. त्यावरून ऋतुजाचा पती व तिच्या सासूवर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला. दोघांनाही अटक केली असून अधिक तपास सुरू असल्याचे सहायक निरीक्षक महेश टाक यांनी सांगितले.

हेही वाचा-बीडमध्ये अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; एकास अटक

ABOUT THE AUTHOR

...view details