महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुखी संसाराच्या स्वप्नांचा चुराडा.. हळद निघण्यापूर्वीच नवरदेवाचा हृदयविकाराने मृत्यू - heart attack

लग्न झाल्यानंतर भावी आयुष्याची स्वप्न रंगवण्यात गुंग असलेल्या नवरदेवाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आज वडवणी तालुक्यातील खडकी देवळा येथे ही दुर्दैवी घटना घडली. २१ मे रोजी मोठय़ा थाटात विवाह झाला. मात्र, लग्न झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांनी २६ वर्षीय तरुणाच्या बाबतीत अशी दुर्घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

काळाचा घाला.. हळद निघण्यापूर्वीच नवरदेवाचा हृदयविकाराने मृत्यू

By

Published : May 26, 2019, 11:26 PM IST

बीड -अनेकजण आपल्या लग्नाचे स्वप्न रंगवत असतात. लग्नानंतर काय करायचे, कोठे फिरायला जायचे याचे नियोजन अगोदरपासूनच करत असतात. मात्र, लग्नानंतर चार दिवसात नवरदेवाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

काळाचा घाला.. हळद निघण्यापूर्वीच नवरदेवाचा हृदयविकाराने मृत्यू

लग्न झाल्यानंतर भावी आयुष्याची स्वप्न रंगवण्यात गुंग असलेल्या नवरदेवाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आज वडवणी तालुक्यातील खडकी देवळा येथे ही दुर्दैवी घटना घडली. २१ मे रोजी मोठय़ा थाटात विवाह झाला. मात्र, लग्न झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांनी २६ वर्षीय तरुणाच्या बाबतीत अशी दुर्घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

बीड जिल्ह्यातील खडकीदेवाळा गावातील अशोक सुग्रीव करांडे या तरुणाचे २१ मे रोजी लग्न झाले. त्यांनी सुखी संसाराला सुरुवात केली. घरात आनंदाचे वातावरण होते. पाहुणे-रावळे, नातेवाईकांनी घर गच्च भरले होते, सगळीकडे आनंदी-आनंद होता. मात्र, या करांडे कुटुंबांवर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला.

आज सकाळच्या सुमारास अशोकच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टारांनी हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले. वडवणीवरून जिल्हा रुग्णालयामध्ये घेऊन येत असताना त्याचा वाटेत मृत्यू झाला. रुग्णालयात पोहचल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने खडकी देवळा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अंगावरील हळद निघण्याअगोदर काळाने घाला घातल्याने करांडे कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details