महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लग्नसोहळा उरकून नवदाम्पत्य पोहोचले पाणी फाउंडेशनच्या श्रमदानाला - नवविवाहित

विवाह पार पडल्यानंतर गावाच्या शिवारातच पाणी फाऊंडेशनचे काम सुरू असलेल्या ठिकाणी भेट देऊन श्रमदान करण्याची ईच्छा वर्षाने प्रविणला बोलून दाखवली. तेव्हा प्रविणनेही लागलीच सहमती दर्शवली. दोघांनीही जलसंधारणाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन श्रमदान केले.

श्रमदान करताना नवदांम्पत्य

By

Published : Apr 21, 2019, 12:00 AM IST

बीड - लग्न म्हटलं की, नवरा-नवरीचा थाटमाट व सप्तसुरांच्या सनईचा निनाद, आजूबाजूला स्वकियांचा गराडा. एकंदरीत लग्नाची सगळी धामधूम व नवरा-नवरीचा थाटमाट असतो. या सगळ्या थाटमाटात लग्नविधी उरकून बीडच्या एका नवदाम्पत्याने थेट गावच्या पाणी फाऊंडेशनच्या सुरू असलेल्या कामावर श्रमदान केले. त्याच्या या कृतीचे परिसरात कौतुक होत आहे.

श्रमदान करताना नवदाम्पत्य


बीड - आष्टी तालुक्यातील शेरी या गावातील रहिवाशी वर्षा महाडिक हिचा विवाह पुणे येथील प्रविण गव्हाणे या मुलाशी आज विवाह पार पडला. दोघेही व्यवसायाने इंजिनीयर असून दोघांच्याही घरातील मंडळी सुशिक्षित आहेत. ठरल्याप्रमाणे शनिवारी दुपारी मोठ्या धामधुमीत वर्षा व प्रविण यांचा विवाह झाला.


विवाह पार पडल्यानंतर गावाच्या शिवारातच पाणी फाऊंडेशनचे काम सुरू असलेल्या ठिकाणी भेट देऊन श्रमदान करण्याची ईच्छा वर्षाने प्रविणला बोलून दाखवली. तेव्हा प्रविणनेही लागलीच सहमती दर्शवली. दोघांनीही जलसंधारणाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन श्रमदान केले.

या नवदाम्पत्यांच्या कृतीमुळे शेरी येथील ग्रामस्थांना देखील प्रेरणा मिळाल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले. दीड-दोन हजार लोकवस्ती असलेल्या आष्टी तालुक्यातील शेरी येथे सातत्याने दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्याची देखील मोठी टंचाई निर्माण झालेली आहे. तेथील दुष्काळ कायमचा मिटावा, अशा शुभेच्छा वर्षा व प्रविण या नवदाम्पत्यांनी ग्रामस्थांना दिल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details