बीड- अंबाजोगाईमधील स्वामी रामानंद शासकीय ग्रामीण रुग्णालय येथील वस्तीगृहाच्या संरक्षण भिंतीच्या बाहेर एका पुरुष जातीच्या अर्भकाला फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. अंबाजोगाई पोलिसांनी त्या अर्भकाच्या कुमारी मातेला अठ्ठेचाळीस तासाच्या आत शोधून काढले आहे. या प्रकरणात कुमारी माता अल्पवयीन असून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.
खड्ड्यात सापडले नवजात अर्भक, अल्पवयीन मातेवर अत्याचार करणाऱ्याचा शोध सुरू - beed crime news
रखरखत्या उन्हात पुरूष जातीचे नवजात अर्भक सापडल्याने बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. फेकून दिलेल्या अर्भकाच्या आईचा अवघ्या ४८ तासात छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात कुमारी मातेशी कोणाचे अनैतिक संबंध होते, याचा तपास अंबाजोगाई शहर पोलीस घेत आहेत.
खड्ड्यात सापडले नवजात अर्भक
रखरखत्या उन्हात पुरूष जातीचे नवजात अर्भक सापडल्याने बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. फेकून दिलेल्या अर्भकाच्या आईचा अवघ्या ४८ तासात छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात कुमारी मातेशी कोणाचे अनैतिक संबंध होते, याचा तपास अंबाजोगाई शहर पोलीस घेत आहेत. दरम्यान, बाळाची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.
Last Updated : May 12, 2020, 12:13 PM IST