मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली होती. या टिकेनंतर पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत, त्यांच्या प्रतिमेचे दहन करत आंदोलन केले.
'मी देवेंद्र फडणवीस यांचा मुर्ख गुलाम' अशा आशयाचे पोस्टरवर लिहून त्यावरील आमदार गोपीचंद पडळकर यांचा फोटोला राष्ट्रवादी युवकांनी जोडे मारले. यावेळी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शिरुर (कासार) येथेही आंदोलन करण्यात आले.