महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शरद पवारांनी दिलेला शब्द पाळला; दुष्काळग्रस्त बीडसाठी पाण्याचे २१ टँकर दाखल - water tanker

जिल्ह्यातील पाणी टंचाई पाहून त्यांनी बीड जिल्ह्याला पाण्यासाठी २१ टँकर देण्याचे आश्वासन दिले होते. अखेर गुरुवारी शरद पवार यांनी ते आश्वासन पूर्ण केले आहे.

शरद पवार

By

Published : May 29, 2019, 10:32 PM IST

बीड- जिल्ह्यात सध्या भीषण पाणीटंचाई आहे. पंधरा दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे बीड जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी जिल्ह्यातील पाणी टंचाई पाहून त्यांनी बीड जिल्ह्याला पाण्यासाठी २१ टँकर देण्याचे आश्वासन दिले होते. अखेर गुरुवारी शरद पवार यांनी ते आश्वासन पूर्ण केले आहे.

शरद पवार बीड दुष्काळ दौऱयात बोलताना

रोहित पवार यांच्या हस्ते पाण्याचे २१ टँकर बीड जिल्ह्यासाठी सुपूर्त करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसने दिली आहे. पवार यांनी बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील जनतेला दिलेला टँकरचा शब्द पाळला असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा पराभव स्वीकारावा लागला. याशिवाय बीड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे मोठ्या मताधिक्क्याने पराभूत झाले. एकंदरीत पराभवाच्या पलीकडे जाऊन शरद पवार यांनी बीड जिल्ह्यासाठी देऊ केलेले टँकर बुधवारी सायंकाळी बीड शहरात दाखल झाले आहेत. या टँकरचे लोकार्पण राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व रोहित पवार यांच्या हस्ते गुरुवारी होणार आहे.

यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे माजी आ. अमरसिंह पंडित, संदीप क्षीरसागर यांची उपस्थिती राहणार आहे. बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीला शरद पवार धावून आले असल्याचे संदीप क्षीरसागर यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details