महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आरोपात तथ्य नाही; करुणा शर्मांच्या तक्रारीवर धनंजय मुंडेंचा खुलासा - धनंजय मुंडे बलात्कापरपराचा आरोप

करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले असून त्यांच्या दोन्ही मुलांना धनंजय मुंडे यांनी त्यांच्या चित्रकूट बंगल्याच्या मागच्या खोलीत 3 महिन्यांपासून कोंडून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यावर या प्रकरणात निव्वळ बदनामी करण्याच्या हेतूने करण्यात येत असलेल्या अशा आरोपात काहीही तथ्य नाही, असा खुलासा धनंजय मुंडे यांनी केला आहे.

धनंजय मुंडेंचा खुलासा
धनंजय मुंडेंचा खुलासा

By

Published : Feb 3, 2021, 11:31 PM IST

Updated : Feb 4, 2021, 12:53 PM IST

बीड - राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ज्या महिलेसोबत संबंध असल्याचे मान्य केले होते त्या करुणा शर्मा यांनी मुंडे यांच्याविरोधात तक्रार केल्याची माहिती बुधवारी समोर आली आहे. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले असून त्यांच्या दोन्ही मुलांना धनंजय मुंडे यांनी त्यांच्या चित्रकूट बंगल्याच्या मागच्या खोलीत 3 महिन्यापासून कोंडून ठेवल्याचा आरोप केला आहे. याबाबत वृत्त प्रसारमाध्यमांवर प्रक्षेपित झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी खुलासा केला आहे.

धनंजय मुंडे खुलाश्यात नेमकं काय म्हणाले?

आज पुन्हा काही माध्यमात माझ्याविरुद्ध करुणा शर्मा यांनी पोलिसात तक्रार केल्याच्या बातम्या प्रसिद्धीस येत आहेत. याबाबत मी खुलासा करू इच्छितो. करुणा शर्मा यांच्या बाबतीत मी पूर्वीच खुलासा केला आहे. त्यांच्यासोबत असलेल्या विवादात मी स्वतःहून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत उच्च न्यायालयाने करुणा शर्मा यांना मनाई आदेशही दिला आहे. त्यानंतर विवादावर तोडगा काढण्यासाठी दोघांनी सहमतीने मीडिएटर नेमण्याची विनंती केल्यानंतर उच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीश ताहिलरामानी यांची मीडिएटर म्हणून नियुक्तीसुद्धा केली आहे.

आरोपात तथ्य नाही, केवळ बदनामीचा हेतू स्पष्ट होतोय

या मीडिएशनच्या दोन बैठक झालेल्या असून 13 फेब्रुवारी 2021 रोजी पुढील बैठक निश्चित झालेली आहे. या मीडिएशनमध्ये मुलांच्या संदर्भातील सर्व विवादासह इतर सर्व मुद्दे चर्चेत आणि निर्णयार्थ आहेत, असे असताना आणि सहमतीने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अतिवरिष्ठ न्यायिक अधिकाऱ्यांसमोर मेडिएशनची प्रक्रिया सुरू असताना अशाप्रकारे मुलांच्या ताब्यावरून तक्रार करणे हे हेतूबद्दल शंका निर्माण करणारे आहे. मुळात जो मुद्दा मेडिएशनमध्ये चर्चेत आहे. त्याबद्दल जाहीर मागणी करणे म्हणजे समोरच्या विरोधीपक्षास न्यायिक प्रक्रियेत काहीही रस नसून निव्वळ मीडिया ट्रायल चालवून बदनामी करणे हाच हेतू दिसुन येतोय.

कृपया सदर बाब ही न्यायप्रविष्ठ असून न्यायालयीन प्रक्रियेअंती जो निर्णय होईल तो सर्वांवर बंधनकारकच असणार आहे. यामुळे या प्रकरणात निव्वळ बदनामी करण्याच्या हेतूने करण्यात येत असलेल्या अशा आरोपात काहीही तथ्य नाही. कृपया ही वस्तुस्थिती आणि न्यायालयीन प्रकरण आणि एखाद्याच्या व्यक्तिगत आयुष्यातील बाब लक्षात घेऊन वृत्त देताना सामाजिक जीवनातील व्यक्तीची बदनामी होणार नाही याची काळजी घ्यावी ही नम्र विनंती,असा खुलासा मंत्री मुंडे यांनी केला आहे.

नेमकं प्रकरण काय?
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात आता आणखी एक तक्रार दाखल झाली आहे. धनंजय मुंडेंनी ज्या महिलेसोबत संबंध असल्याचं मान्य केलं होतं त्या करुणा शर्मा यांनीच आता एकदा तक्रार केली आहे. यापूर्वी करुणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा यांनी तक्रार केली होती. मात्र त्यांनी ती तक्रार मागे घेतली होती. यानंतर आता धनंजय मुंडे यांनी ज्या महिलेबाबत आपण सहमतीने संबंधात होतो, त्या करुणा शर्मा यांनी मौन सोडलं आहे. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले असून त्यांच्या दोन्ही मुलांना धनंजय मुंडे यांनी त्यांच्या चित्रकूट बंगल्याच्या मागच्या खोलीत 3 महिन्यांपासून कोंडून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.


करुणा शर्मा यांचे आरोप काय?
करुणा शर्मा यांनी असाही आरोप केला आहे की, त्यांना त्यांच्या मुलांना भेटू दिले जात नाही. धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचे सबंध असून त्यातून त्यांना दोन मुले झाल्याचे याआधी मंत्री धनंजय मुंडे यांनी मान्य केले होते. धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार, घरगुती हिंसाचार आणि इतर कलमांर्गत गुन्हा दाखल करण्याची करुणा शर्मा यांची मागणी आहे. करुणा शर्मा यांची गंभीर तक्रार आहे. करुणा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार, घरगुती हिंसाचार आणि इतर कलमांर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. इतकंच नाही तर आपल्या दोन्ही मुलांना धनंजय मुंडे यांनी त्यांच्या चित्रकूट बंगल्याच्या मागच्या खोलीत 3 महिन्यापासून कोंडून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

करुणा शर्मा यांच्या बहिण रेणू शर्मानेही केले होते आरोप

करूणा शर्मा यांच्या बहिण रेणू शर्मा यांनीही काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंवर बलात्काराचे आरोप केले होते. बॉलीवूडमध्ये गायिका म्हणून ब्रेक मिळवून देतो असे सांगून मुंडेंनी आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार रेणू शर्मा यांनी केली होती. यानंतर राज्यात एकच राजकीय वादंग उठले होते. मात्र यानंतर कुटुंबीयांची बदनामी होत असल्याचे कारण देत रेणू शर्मांनी तक्रार मागे घेतली होती. आपल्यावर कसलाही दबाव नसल्याचेही रेणू शर्मा यांनी यावेळी स्पष्ट केले होते.

रेणू शर्मांच्या आरोपांनंतर मुंडेंचा खुलासा
रेणू शर्मा यांच्या आरोपानंतर धनंजय मुंडेंनी फेसबूकवर पोस्ट टाकून रेणू यांच्या बहीण करूणा शर्मांसोबत सहमतीने 2003 पासून आपले संबंध असल्याचा खुलासा केला होता. करुणा शर्मा यांच्याकडून आपल्याला दोन मुले झाल्याची कबुलीही त्यांनी दिली होती. या दोघांनाही धनंजय मुंडेंनी स्वतःचे नाव दिले आहे, तसेच त्यांची जबाबदारीही धनंजय मुंडेंनी स्वीकारलेली आहे. याविषयी आपली पहिली पत्नी व नातेवाईकांना माहिती असल्याची कबुलीही मुंडेंनी फेसबूक पोस्टमधून दिली होती.

Last Updated : Feb 4, 2021, 12:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details