माजी मंत्री धनंजय मुंडे कार्यक्रमात बोलताना बीड : जिल्ह्यात मुंडे बहीण भावात वादाची ठिणगी पडली असून कामाचे श्रेय कुणी घ्यायचे आणि काम कोणी आणले यामधून वाद सुरू झाले आहेत. माजी मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा हा वाद काही नवीन नाही. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांनी त्यांचा वसा आणि वारसा पुढे चालू ठेवला. मात्र, 2019 मध्ये पंकजा मुंडे यांना धूळ चारत धनंजय मुंडे यांनी गुलाल उधळला आणि पुन्हा एकदा जिल्ह्यात बहिण भावातील राजकीय वाद समोर येत असल्याचे पाहायला मिळत आहे.
धनजंय मुंडे काय म्हणाले? :माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एक दिवस अगोदर पंकजा मुंडे यांनीही एक वक्तव्य केले होते की, मी कुणाच्या कामाचे श्रेय घेत नाही. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी जलजीवन मशीनच्या उद्घाटनप्रसंगी ही पंकजा मुंडे यांना ओपन चॅलेंज केले आहे. ते म्हणाले की, मी एमआयडीसी आणली तुम्ही एक तरी उद्योग त्या एमआयडीसीत आणा आणि तुम्ही म्हणाल, ते मी राजकारणात करायला तयार आहे. परळी मतदारसंघातील टोकवाडी या गावातील जलजीवन मशीनच्या उद्घाटनप्रसंगी धनंजय मुंडे हे बोलत होते.
दोघांचे स्वप्न पुर्ण करतोय : धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, मी आमदार म्हणून या ठिकाणी काम करत आहे आणि कुणाचा फुकटचा वारसा घेऊन काम करत नाही, आणि सगळे दुसऱ्याच्याच जीवावर माझ्या मातीतला माणूस इथे मोठा होत नाही. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचे व अण्णांचे स्वप्न पूर्ण होणार नाही आणि मुंडे साहेबांचे आणि आनंद स्वप्न काय होते की आम्ही मोठे झालोत पण माझ्या मातीतला माणूस मोठा झाला पाहिजे. आज त्या दोघांचे स्वप्न मी पूर्ण करतोय आणि माझ्या मातीतला माणूस मी मोठा करतोय.
तेरा कोटी रूपये दिले? : ते पुढे म्हणाले की, माझ्यावर टीका झाली की हा केंद्र सरकारचा पैसा आहे, हा जलजीवनचा आराखडा मी पालकमंत्री असताना केलेला आहे. मी जल जीवन मशीनमध्ये जी गाव घेतली आहे. त्या प्रत्येक गावाला तेरा कोटी रुपये दिले आहेत, पालकमंत्री असताना मी हा आराखडा केलेला आहे. त्याच्या तांत्रिक मान्यता मी मंत्री असताना मिळालेल्या आहेत, हे मी सांगत नाही तर सरकारचे रेकॉर्ड सांगत आहे. त्याच्यामध्ये ज्या ग्रामपंचायत तुमच्या आलेल्या आहेत. त्यांचे उद्घाटन तुम्ही करा मी त्याचे अधिकार तुम्हाला आहेत, आणि माझ्यावर टीका करत असताना टीका अशी करू नका.
हेही वाचा :Yashwantrao Chavan : यशवंतराव चव्हाणांनी संरक्षणमंत्रीपद स्वीकारण्यापूर्वी 'या' व्यक्तीची घेतली होती परवानगी; जाणून घ्या तो किस्सा...