प्रभू वैद्यनाथ कृपेने लवकरच बऱ्या व्हाल…! बहीण प्रीतम मुंडेंसाठी भाऊ धनंजय मुंडेंचा काळजीयुक्त संदेश - प्रीतम मुंडें
बीडमध्ये धनंजय मुंडे आणि मुंडे बहिणींमधला वाद काही जनतेला नवा नाही. या दोन कुटुंबांमधले आरोप-प्रत्यारोप लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक निवडणुकांमध्ये देखील पाहायला मिळाले आहेत. मात्र, त्यापलीकडे जाऊन या बहीण-भावंडांमध्ये असलेलं नाते देखील काही प्रसंगी समोर येते.
ncp dhananjay munde
बीड - खासदार प्रीतम मुंडे यांना काही लक्षणे आढळल्यामुळे त्या उपचार घेत असल्याचे समजले. प्रभू वैद्यनाथ कृपेने लवकरच बर्या व्हाल ही खात्री आणि सदिच्छा व्यक्त करतो, अशी भावनिक प्रार्थना सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. अशा आशयाचे ट्विट मुंडे यांनी आज केले आहे.