मुंबई/बीड - किरण गोसावी याचा सुरक्षारक्षक प्रभाकर साईल याने एनसीबीच्या क्रुझ कारवाईची व्हिडिओ, फोटोद्वारे पोलखोल केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी यानंतर सत्य जीतेगा, सत्यमेव जयते, असे ट्विट करत, समीर वानखेडे यांना आव्हान दिले आहे. सीडीआर तपासून एसआयटी (विशेष तपास पथक) मार्फत चौकशी करावी, अशी मुख्यमंत्र्याकडे मागणी करणार असल्याचे मलिक यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
एनसीबी विरोधात गौप्यस्फोट
क्रुझवरील ड्रग्स पार्टीवर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या टीमने छापेमारी केली. आर्यन खानसह सात जणांना ताब्यात घेतले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री मलिक यांनी हरकत घेत कारवाई बनावट असल्याचे आरोप समीर वानखेडे यांच्यावर केले होते. प्रकरणाचा तपास सुरू असतानाच वानखेडे यांना टार्गेट केल्याने मलिक यांच्यावर भाजपकडून टीकेची झोड उठली होती. प्रकरण ताजे असतानाच, आता साक्षीदार असलेल्या के.पी. गोसावी याच्या सुरक्षारक्षकानेच एनसीबीसंदर्भात गौफ्यस्फोट केले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. मलिक यांनी यावरुन समीर वानखेडे यांनी पुन्हा लक्ष केले आहे.
ही तर संघटीत गुन्हेगारी