बीड -माजलगाव तालुक्यातील पात्रूड येथे लहान भावाने मोठ्या भावाचा चाकूने वार करुन खून केल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने तालुका हादरला असून खुनाला संपत्तीच्या वादाची किनार आहे.
दोघा भावांमध्ये संपत्तीवरुन वाद-
पोलिसांच्या माहितीनुसार, पात्रूड येथे मुख्य रस्ता असलेल्या माजलगाव -तेलगाव रोडवर शेख ईशाद शेख शकील (३०) व त्याचा लहान भाऊ शेख अर्शद शेख शकील (२५) यांची मोबाईल शॉपी आहे. या दोघा भावांमध्ये संपत्तीवरुन वाद होता. यातूनच सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. यातून अर्शदने शेख ईशाद याला चाकूने भोसकले. यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.