अंबाजोगाई(बीड): शहरातील मंगळवार पेठ भागात गुरुवारी (आज) पहाटे एका तरूणाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. डोक्यावर कुठल्यातरी वस्तूने प्रहार करून हा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. नितीन उर्फ बबलू साठे (वय ३८) असे मृत तरूणाचे नाव असून ज्युन्या वादातून हा खून झाल्याची माहीती आहे. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु असून पुढील तपास शहर पोलीस करत आहे.
प्राथमिक माहितीनुसार शहरातील मंगळवार पेठ भागात गुरुवारी (आज) पहाटेच्या सुमारास जुन्या वादातून खून झाल्याची घटना समोर आली आहे. जुन्या वादातून झालेल्या मारहाणीत डोक्याला गंभीर इजा होऊन नितीनचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनेची माहीती मिळताच पोलीसांनी तात्काळ घटनेच्या कारणांचा शोध घेत दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. तर या घटनेतील मुख्य संशयित फरार झाला असून त्याचा कसून तपास सुरू आहे. मागील महिन्यात नितीनचा मुख्य संशयितासोबत वाद झाला होता, त्यातून हा प्रकार घडल्याची माहीती आहे.
दहा दिवसातील दुसरी घटना