महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खासदार प्रीतम मुंडे यांनी नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी; शेतकऱ्यांशी साधला संवाद - crop loss bhendi takli

गेवराई, तसेच माजलगाव भागातील शेतकरी हे प्रामुख्याने कापूस उत्पादक असल्याने येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीच्या अकस्मात संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. परंतु, त्यांनी या संकटाचा धैर्याने सामना करावा. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी मी प्रयत्नशील आहे, असा विश्वास खासदार मुंडे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

खासदार प्रीतम मुंडे
खासदार प्रीतम मुंडे

By

Published : Oct 1, 2020, 8:23 PM IST

बीड- गत आठवड्यात अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन, कापूस, तूर या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. खासदार प्रीतम मुंडे यांनी आज गेवराई तालुक्यातील नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली. यावेळी मुंडे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करावे अशा सूचना केल्या.

नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना खासदार प्रीतम मुंडे

बहुतांश भागात तलाठी अथवा मंडळ अधिकारी नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी पोहोचलेले नाही. ही वस्तुस्थिती आहे. अशात खासदार प्रीतम मुंडे यांनी गेवराई तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. मुंडे यांनी भेंडी टाकळी, पाचेगाव व एरंडगाव भागाला भेटी दिली व नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. गेवराई, तसेच माजलगाव भागातील शेतकरी हे प्रामुख्याने कापूस उत्पादक असल्याने येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीच्या अकस्मात संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. परंतु, त्यांनी या संकटाचा धैर्याने सामना करावा. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी मी प्रयत्नशील आहे, असा विश्वास खासदार मुंडे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

हेही वाचा-विवेकने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीकडे दुर्लक्ष करू नका - मराठा क्रांती मोर्चा

ABOUT THE AUTHOR

...view details