बीड- मी मुंबईमध्ये रेड झोनमध्ये राहात होते. सुरुवातीला बीड जिल्हा ग्रीन झोनमध्ये होता. आपण रेड झोनमधून कशाला यायचं म्हणून मी बीडला आले नाही, असे स्पष्टीकरण बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी मंगळवारी बीडमध्ये आल्यानंतर माध्यमांशी बोलताना दिले.
बीडच्या खासदार कोरोनाच्या बिकट परस्थितीत बीड जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून मुंबईत बसल्या आहेत, अशी टीका विरोधकांकडून खासदार मुंडे यांच्यावर गत आठवड्यात झाली होती. बीड जिल्ह्यात सर्वच पक्ष संघटना व सेवाभावी संस्थांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाला कोरोनाच्या बिकट परिस्थितीत मदत केली आहे. या सगळ्या परिस्थितीत मात्र बीडच्या खासदार प्रीतम मुंडे जिल्ह्यात उपस्थित नव्हत्या यावरुन त्यांच्यावर व माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर टीका झाली होती.