बीड- वंशाला दिवाच हवा ही मानसिकता बदलता बदलत नसल्याचा प्रत्यय बीड येथे आला. जिल्ह्यातील पाडळसिंगीजवळ एका निर्दयी मातेने अडीच महिन्याच्या मुलीला रस्त्यावर फेकून दिल्याची घटना समोर आली. त्या चिमुकलीला पहाटे ४.३० वाजता आयआरबीच्या रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वार्ड क्र. ९ मध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत.
अडीच महिन्याच्या मुलीला फेकले रस्त्यावर; निर्दयी मातेचा शोध सुरू - mother
त्या चिमुकलीला पहाटे ४.३० वाजता आयआरबीच्या रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वार्ड क्र. ९ मध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत.

अडीच महिन्याच्या मुलीला फेकले रस्त्यावर
याबात अधिक माहिती अशी की, पाडळसिंगीजवळ रस्त्याच्याकडेला पहाटे मुलीचा रडण्याचा आवाज आल्यानंतर तेथील नागरिकांनी आयआरबीच्या रुग्णवाहीकेला फोन करून ही माहिती दिली. त्यानंतर तत्काळ रुग्णवाहीकेने त्या लहान मुलीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पहाटे ४.३० वाजता दाखल करण्यात आले.
डॉक्टरांनी तपासून तिच्यावर सध्या वार्ड क्र. ९ (एसएनआयसीयू) मध्ये उपचार सुरूकेले. याप्रकरणी जिल्हा रुग्णालयातील चौकीतील एएसआय गांधले यांनी गेवराई पोलिसांना माहिती दिली असून ते या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.