महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'फादर्स डे'ला काळीमा; मुलाच्या मारहाणीत आईचा मृत्यू; वडील गंभीर - मुलाकडून पालकांना मारहाण

बीड जिल्ह्यातील घाटशिळ पारगाव येथील बाबासाहेब खेडकर या विकृत व्यक्तीने आपल्या आई-वडिलांना शनिवारी सायंकाळी चारच्या दरम्यान काठीने बेदम मारहाण केली. मारहाणीची ही घटना घडत असतानाचा गावातील एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ चित्रित केला आहे. त्यानंतर रविवारी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने घाटशिळ पारगावासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मुलाने केलेल्या बेदम मारहाणीत आईचा मृत्यू
मुलाने केलेल्या बेदम मारहाणीत आईचा मृत्यू

By

Published : Jun 20, 2021, 10:49 AM IST

Updated : Jun 20, 2021, 11:23 AM IST

बीड- एकीकडे फादर्स-डे निमित्ताने संपूर्ण देशभरात वडिलांचे ऋण व्यक्त केले जात आहे. तर दुसरीकडे मात्र बीड जिल्ह्यातील घाटशिळ-पारगाव येथे एका मुलाने आपल्या आई-वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये गंभीर बाब म्हणजे या मारहाणीत आईचा मृत्यू झाला असून वडील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नागरिकांमधून या मुलाच्या कृत्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. बाबासाहेब खेडकर असे मारहाण करणाऱ्या विकृत मुलाचे नाव आहे, तर शिवबाई खेडकर असे मृत आईचे नाव आहे.

मुलाने केलेल्या बेदम मारहाणीत आईचा मृत्यू; वडील गंभीर

सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडिओ-


याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, बीड जिल्ह्यातील घाटशिळ पारगाव येथील बाबासाहेब खेडकर या विकृत व्यक्तीने आपल्या आई-वडिलांना शनिवारी सायंकाळी चारच्या दरम्यान काठीने बेदम मारहाण केली. मारहाणीची ही घटना घडत असतानाचा गावातील एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ चित्रित केला आहे. त्यानंतर रविवारी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने घाटशिळ पारगावासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेतून बाबासाहेब खेडकर यांचा विकृतपणा चव्हाट्यावर आला आहे. या मारहाण प्रकरणी अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही.

बाबासाहेब खेडकर हा काठीने आपल्या जन्मदात्या आई-वडिलांना बेदम मारहाण करतानाचे दृश्य या व्हिडिओमध्ये दिसत आहे. कृत्य तो सतत अधून मधून करत असतो असे येथील काही ग्रामस्थांनी सांगितले. मात्र नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यामध्ये बाबासाहेब खेडकर याची आई शिवबाई खेडकर यांचा मृत्यू झाला आहे. तर वडील नगर येथील दवाखान्यात उपचार घेत असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

आज(रविवारी) जागतिक फादर्स डे आहे. यानिमित्ताने देशभरात वडिलांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. मात्र दुसरीकडे बीड जिल्ह्यात घाटशिळ पारगाव येथे आई-वडिलांना काठीने मारहाण करताना मुलाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही बाब खेदजनक आहे.

तात्काळ चौकशी करू-

याबाबत बीडचे पोलीस अधीक्षक आर. राजा यांना विचारना केली असता, ते म्हणाले व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओची तात्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल. हा प्रकार खेदजनक असल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

Last Updated : Jun 20, 2021, 11:23 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details