महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीड : विजेचा धक्का लागल्याने मायलेकीचा मृत्यू; माजलगाव येथील घटना - majalgaon mother and daughter died news

विजेचा धक्का लागल्याने मायलेकीचा मृत्यू झाल्याची घटना बीडमधील माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथे घडली. महावितरणच्या दुर्लक्षाने ही घटना घडली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

mother and daughter died due to electric shock in beed
बीड : विजेचा धक्का लागल्याने मायलेकीचा मृत्यू; माजलगाव येथील घटना

By

Published : May 23, 2021, 3:34 PM IST

माजलगाव (बीड) -विजेचा धक्का लागलेल्या आईला वाचवण्यासाठी गेलेल्या मुलीला विजेचा धक्का लागल्याने दोघींचाही जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना रविवारी (२३ मे) सकाळी माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथे घडली. शशिकलाबाई शंकरराव फपाळ (६५) व सखुबाई फपाळ (४५) असे दोघींचे नाव आहे.

दोघी मायलेकींचा होरपळून मृत्यू -

किट्टी आडगाव येथील पाटील गल्ली येथे शशिकलाबाई शंकरराव फपाळ या मुलगी सखुबाई सोबत राहत होते. रविवारी सकाळी ६ वाजता झोपेतून उठल्यानंतर शशिकलाबाई यांचा हात भींतीला लागला असता त्यांना तीव्र विजेचा धक्का बसला. यावेळी मुलगी सखुबाई आईला काय झाले, हे पाहण्यासाठी गेली असता, तिलादेखील तीव्र धक्का बसला. यात दोघी मायलेकींचा होरपळून मृत्यू झाला. दरम्यान, पाटील गल्ली येथे मागील आठ दिवसांपासून अनेक घरात विद्युत प्रवाह उतरला असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी महावितरणकडे केल्या होत्या. परंतु, संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष न देता दुर्लक्ष केले. यातूनच ही घटना घडली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

हेही वाचा - रायगडच्या समुद्रकिनारी सापडले आठ मृतदेह; पी 305 बार्जमधील कर्मचाऱ्यांचे मृतदेह असल्याची शक्यता

ABOUT THE AUTHOR

...view details