बीड जिल्ह्यात सर्वात जास्त ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात - most gram panchayats are under the control of NCP
बीड जिल्ह्यात एकूण 704 ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. त्यामध्ये सर्वाधीक ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचाच झेंडा फडकला आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात ताई आणि भाऊ अस राजकारण असल्याने मुंडे यांच्यातली ही लढाई मानली जाते. या ग्रामंपचायतींचा निकाल पाहता धनंजय मुंडे यांनी आपला प्रभाव दाखवला आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
बीड जिल्ह्यात सर्वात जास्त ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात
बीड -जिल्ह्यात एकूण 704 ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. त्यामध्ये सर्वाधीक ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचाच झेंडा फडकला आहे. यामध्ये ग्रामपंचायतींचा खालीलप्रमाणे निकाल लागला आहे.
भाजप - 269
शिंदे गट - 45
ठाकरे गट - 48
राष्ट्रवादी - 273
काँग्रेस - 60
मनसे - 00
इतर - 08
एकूण 703 ग्रामपंचायत निकाल...एका ग्रामपंचायतीची एक वार्डसाठी फेर निवडणूक होणार आहे. यामध्ये 70 ग्रामपंचायतीवर जयदत्त क्षीरसागर यांनी दावा केलाय. दावे प्रतिदावे हे खुप मोठ्या स्वरूपाच्या आकड्यात आहेत.