महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मराठा आरक्षण संदर्भात 28 जून रोजी बीडमध्ये भाजपचा मोर्चा; आमदार धस यांची माहिती

मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नासंदर्भात पुन्हा नव्याने विनंती याचिका न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे. या याचिकेवर तरी आघाडी सरकारने भक्कमपणे मराठा समाजाची बाजू मांडावी. या मागणीसाठी 28 जून रोजी बीड येथे मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती गुरुवारी आमदार धस यांनी दिली.

reservation Request Petition MLA Dhas
विनंती याचिका आमदार धस

By

Published : Jun 24, 2021, 5:35 PM IST

बीड -मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नासंदर्भातपुन्हा नव्याने विनंती याचिका न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे. या याचिकेवर तरी आघाडी सरकारने भक्कमपणे मराठा समाजाची बाजू मांडावी. या मागणीसाठी 28 जून रोजी बीड येथे मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती गुरुवारी आमदार धस यांनी दिली.

माहिती देताना भाजप आमदार सुरेश धस

हेही वाचा -हॉलमार्क सोने खरेदी ग्राहकांच्या फायद्याचीच; आता सोन्याच्या वस्तूवर दुकानदाराचाही येणार स्टॅम्प

आघाडी सरकारने मराठा आरक्षणाची वाट लावली

बीड येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना धस म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. भाजप सरकार सत्तेत असताना मराठा समाजाला आरक्षण दिले होते. हा निर्णय स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता, मात्र पुढे सत्तेत आलेल्या आघाडी सरकारने मराठा आरक्षणाची पूर्ण वाट लावली. न्यायालयात मराठा समाजाच्या बाजूने भक्कमपणे उभे राहण्याची गरज होती. मात्र, तसे आघाडी सरकारने केले नाही, असा आरोपही धस यांनी केला.

विनंती याचिकेसंदर्भात सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी - धस

आता पुन्हा नव्याने मराठा आरक्षण मागणी संदर्भात विनंती याचिका न्यायालयात दाखल केलेली आहे. या याचिकेवर आघाडी सरकारने सकारात्मक भूमिका घेऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावे. या मागणीसाठी 28 जून रोजी बीडमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती धस यांनी दिली.

हेही वाचा -जिल्हा रुग्णालयात असतानाही खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्‍टरांना बजावली नोटीस

ABOUT THE AUTHOR

...view details