महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माजलगावचे मोहन जगताप भाजपच्या वाटेवर - पंकजा मुंडे

माजलगाव येथील छत्रपती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मोहन जगताप हे सोमवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

माजलगावचे मोहन जगताप भाजपच्या वाटेवर

By

Published : Mar 24, 2019, 11:33 PM IST

बीड - जिल्ह्यातील माजलगाव येथील छत्रपती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मोहन जगताप हे सोमवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मागील ३ वर्षापासून ते मोहन जगताप मित्र मंडळ अंतर्गत माजलगाव विधानसभा मतदारसंघात कार्यरत आहेत. आता ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. माजलगाव येथील स्थानिक राजकारणात माजी मंत्री प्रकाश सोळंके यांचे ते कट्टर विरोधक आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोहन जगताप यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे.

कोण आहेत मोहन जगताप -

नगर परिषद निवडणुकीपासून मोहन जगताप राष्ट्रवादीपासून दुरावले होते. त्यानंतर त्यांनी मोहन जगताप मित्र मंडळ स्थापन करून त्याअंतर्गत माजलगाव विधानसभा मतदारसंघात काम सुरू ठेवले. येणाऱ्या काळात जगताप काय निर्णय घेणार, अशी चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू असतानाच सोमवारी ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. माजी आमदार बाजीराव जगताप यांचे ते चिरंजीव आहेत. याशिवाय छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे ते उपाध्यक्ष आहेत.

सोमवारी पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मोहन जगताप भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या मोहन जगताप यांना भाजप येणाऱ्या विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देणार का? हा प्रश्न अद्याप तरी अनुत्तरित आहे. कारण माजलगावमधून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय आर. टी. देशमुख सध्या आमदार आहेत. याशिवाय रमेश आडसकरदेखील माजलगावमधून इच्छुक आहेत. अशा परिस्थितीत मोहन जगताप यांच्या वाट्याला काय येते, हे पाहण्यासाठी वेळ जाऊ द्यावा लागणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details