बीड - जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दूध उत्पादक आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून दूध शेतकरी दूध व्यवसायाकडे शेतकरी वळतात. परंतु, शासनाच्या धोरणामुळे दुधाला अत्यल्प भाव मिळत आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव दिला नाही, तर दूध उत्पादक आर्थिक संकटात सापडेल. त्यामुळे सरकारने तत्काळ दुधाला भाव वाढ द्यावी, अशी मागणी भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी केली. आज धस यांच्या नेतृत्वाखाली आष्टी येथे दूध आंदोलन करण्यात आले. यावेळी मोफत दूध वाटप करून राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला.
'सरकारने दुधाचे भाव तत्काळ वाढवावेत अन्यथा...' - सुरेश धस दूध आंदोलन
कोरोना विषाणूचा कहर सुरू झाल्यापासून राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला प्रतिलिटर मागे केवळ १५ ते २० रुपये भाव मिळत आहे. दुधाला किमान 30 ते 35 रुपय प्रति लिटर भाव मिळावा यासाठी राज्यभर दूध आंदोलनाला आजपासून सुरुवात झाली आहे. आष्टी येथे आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
सुरेश धस
जर दूध उत्पादकांनी उभी केलेली दूध व्यवसायाची यंत्रणा कोलमडली तर पुन्हा ती यंत्रणा उभारणे अवघड होते. शेतकऱ्यांच्या दुधाला प्रतिलिटर मागे 10 रुपये वाढीव भाव द्यावा, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली. कोरोना विषाणूचा कहर सुरू झाल्यापासून राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला प्रतिलिटर मागे केवळ १५ ते २० रुपये भाव मिळत आहे. दुधाला किमान 30 ते 35 रुपय प्रतिलिटर भाव मिळावा यासाठी राज्यभर दूध आंदोलनाला आजपासून सुरुवात झाली आहे.