महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Amol Matale On Santosh Bangar : घोटाळा करणाऱ्यांना मुदतवाढ देण्याची बांगर यांची मागणी योग्य कशी?- अमोल मातेले - आरोग्य विभाग

बीड : आरोग्य विभागात (Department of Health) बोगस रीतीने फवारणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई (Bogus Spraying Staff Action) केल्यानंतर आता त्याच कर्मचाऱ्यांवर पुन्हा कामावर घ्या असे पत्र आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी आरोग्यमंत्र्यांना दिले. Amol Matale On Santosh Bangar

Amol Matele and Santosh Bangar
अमोल मातेले आणि संतोष बांगर

By

Published : Nov 16, 2022, 5:24 PM IST

बीड :आरोग्य विभागात (Department of Health) बोगस रीतीने फवारणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई (Bogus Spraying Staff Action) केल्यानंतर आता त्याच कर्मचाऱ्यांवर पुन्हा कामावर घ्या असे पत्र आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी आरोग्यमंत्र्यांना दिले असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि स्पर्धा परीक्षा समन्वय समिती (Competitive Examination Coordinating Committee) यांनी म्हणत ह्या पत्रावर सवाल विचारला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी देखील करावी असे म्हटले आहे. Amol Matale On Santosh Bangar

राकॉं नेते अमोल मातेले यांची आ. बांगर यांच्यावर टीका


शिंदे गटात दुहेरी भूमिका-महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागात बोगस फवारणी प्रकरणी काही शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. ही घटना बीड जिल्ह्यामध्ये झाली होती. ही कारवाई मागील एक महिन्यापूर्वी केलेली होती. त्यासंदर्भात कारवाई केलेल्या व्यक्तींना पुन्हा कामावर घ्यावे अशा रितीचे पत्र बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटाचे आमदार संतोष लक्ष्‍मण बांगर यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना लिहिलेले आहे. त्यांच्या या पत्रामुळे शिंदे गटातच आता दोन भूमिका समोर आल्याचे चित्र दिसत आहे.


बनावट फवारणी कर्मचारी प्रमाणपत्र प्रकरण -आरोग्य विभागाच्या बीड जिल्ह्याच्या हिवताप कार्यालय या ठिकाणाहून बोगस हंगामी फवारणी कर्मचारी प्रमाणपत्र बाबत चौकशी केली गेली होती. त्यामध्ये के. एस.आंधळे सेवानिवृत्त जिल्हा हिवताप अधिकारी बीड तसेच जे एस सानप कीटक संहारक, जिल्हा हिवताप कार्यालय बीड आणि के. के. सातपुते सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक जिल्हा बीड या अधिकाऱ्यांवर बनावट फवारणी कर्मचारी यांचे प्रमाणपत्र दिले. यामुळे कारवाई केली गेली होती. ही कारवाई आरोग्य विभागाचे सचिव यांनी केलेली होती. आता कारवाई केल्यानंतर आमदार संतोष बांगर यांनी या प्रकरणाबाबत माहे फेब्रुवारी 2023 पर्यंत मुदतवाढ देऊन नवीन समिती नियुक्त करण्यात यावी असे म्हटले आहे. याचा अर्थ ज्यांच्यावर कारवाई झालेली आहे त्यांना अजून 2023 पर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती या पत्रामध्ये करण्यात आलेली आहे. हे पत्र 18 नंबर 2022 रोजी संतोष बांगर यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना लिहिलेल आहे.

अमोल मातेले यांची आ. बांगर यांच्यावर टीका -या संदर्भात स्पर्धा परीक्षा समिती समन्वयक राहुल गोठेकर यांनी सांगितले की," ज्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे त्यांची नावे आरोग्य भरती घोटाळ्यामध्ये देखील आली होती. त्यामुळे घोटाळेबाज व्यक्तींना कामावर घ्या, असे आमदार संतोष बांगर कसे काय म्हणू शकतात;" असा प्रश्न केलेला आहे. तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते एडवोकेट अमोल मातेले यांनी म्हटले की, हिंगोलीचे सुप्रसिद्ध मारझोड करणारे आमदार संतोष बांगर यांनी या तीन अधिकाऱ्यांना घोटाळामध्ये दोषी आढळल्यानंतरही त्यांना आता पुन्हा समितीवर घ्या असे पत्र लिहिलेले आहे. हे पत्र आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना लिहिलेले आहे. यामागे काय कारण आहे ते समजत नाही. मुख्यमंत्र्यांनी ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. तसेच ज्या अधिकाऱ्यांना सस्पेंड केलेला आहे त्यांना पुन्हा कामावर घेऊ नका, असे देखील त्यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद साधताना म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details