महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अंबाजोगाई स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयास आमदार फंडातून मिळणार 5 व्हेंटिलेटर - Mla sanjay daund

आमदार संजय दौंड यांनी येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयास 5 व्हेंटिलेटसह इतर उपकरणे खरेदीसाठी 1 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

अंबाजोगाई स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयास आमदार फंडातून मिळणार 5 व्हेंटिलेटर
अंबाजोगाई स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयास आमदार फंडातून मिळणार 5 व्हेंटिलेटर

By

Published : May 9, 2021, 8:30 AM IST

अंबाजोगाई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनेच हाहाकार माजवलेला आहे. त्यात आता तिसऱ्या लाटेचे संकेत दिले जात आहेत. या पार्श्वभूमीवर रुग्णालये सुसज्ज असली पाहिजेत. त्या दृष्टीने कोरोनाशी लढा देण्यासाठी विधान परिषदेचे आमदार संजय दौंड यांनी येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयास 5 व्हेंटिलेटसह इतर उपकरणे खरेदीसाठी 1 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

यंत्रसामुग्री खरेदीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून राज्य शासनाने सर्व आमदारांनी आपला 1 कोटी रुपयांचा निधी आपापल्या मतदारसंघात कोविड रुग्ण सेवेसाठी वापरण्याचा अधिकार दिला आहे. याच अनुषंगाने आमदार दौंड यांनी येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड विभागासाठी 75 लाख रुपये किंमतीचे 5 एन आय सीयु व्हेंटिलेटर, जिला कंपनीचे 10 रेडीयंट वॉर्मर, (5 लाख), फिल्प्स जीई कंपनीचे 6 नॅशनल मॉनिटर (6 लाख), एंडोस्कोप स्पायनस सर्जरीसाठी 2 मायक्रोडिब्रेडर (14 लाख) ही यंत्रे आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन 2021-22 मधुन फंडातुन तत्काळ खरेदी करावीत, असे पत्र जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details