बीड -जिल्ह्यातील महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत कार्यरत असणाऱ्या २८ कर्मचाऱ्यांची सेवा जिल्हा प्रशासनाने कोणतीही पूर्वकल्पना न देता समाप्त केली होती. यानंतर या २८ कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारात होते, परंतु सदर बाब लक्षात येताच बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे सेवा समाप्तीचा आदेश जिल्हा प्रशासनाने २४ तासांच्या आत वापस घेतल्याने या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यानंतर मग्रारोहयो कंत्राटी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आ. संदिप क्षीरसागर यांचे आभार व्यक्त करण्यात आले. आमदार संदीप यांच्यामुळेच आमचा हा प्रश्न मार्गी लागल्याची प्रतिक्रिया कृती समितीच्या वतीने देण्यात आली.
अखेर कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी आ. क्षीरसागर आले धावून; 28 जणांना केले होते कामावरुन कमी - beed distric administration
एकीकडे रोजगार हमीची कामे सुरू करण्यासाठी शासन आदेश देत आसताना जिल्हा प्रशासनाने मात्र, रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या २८ अभियंता आणि लिपिकांची सेवा समाप्त करून या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आणली होती. अशावेळी आमदार संदीप क्षीरसागर हे या कर्मचाऱ्यांसाठी धावून आले. प्रशासनाला हा आदेश रद्द करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. परिणामी प्रशासनाने काही तासातच हा आदेश मागे घेत सदर कर्मचाऱ्यांना सेवेत पुन्हा सामावून घेतले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उपासमारीची वेळ आली आहे. परंतु, एकीकडे रोजगार हमीची कामे सुरू करण्यासाठी शासन आदेश देत आसताना जिल्हा प्रशासनाने मात्र, रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या २८ अभियंता आणि लिपिकांची सेवा समाप्त करुन या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आणली होती. अशावेळी आमदार संदीप क्षीरसागर हे या कर्मचाऱ्यांसाठी धावून आले. प्रशासनाला हा आदेश रद्द करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. परिणामी प्रशासनाने काही तासातच हा आदेश मागे घेत सदर कर्मचाऱ्यांना सेवेत पुन्हा सामावून घेतले. तर, आमदार क्षीरसागर यांच्यामुळेच आमचा जीवनाचा प्रश्न मार्गी लागला, असल्याचे मत कर्मचाऱ्यांनी यावेळी व्यक्त केले.