महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 20, 2022, 12:57 PM IST

ETV Bharat / state

Gram Panchayat Election Result : क्षीरसागर काका पुतण्याच्या लढतीत पुतण्याचा विजय ; संदीप क्षीरसागर यांची नवगन राजुरी ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता

बीडमधील नवगन राजुरी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदिप क्षीरसागर यांनी बाजी मारली (MLA Sandeep Kshirsagar won) आहे. क्षीरसागर काका पुतण्याच्या लढतीत पुतण्याचा विजय झाला (gram panchayat election result) आहे. राजुरी मतदारसंघातील पहिल्या फेरीत सर्वच ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात आले (Navagan Rajuri Gram Panchayat Election 2022) आहेत.

Gram Panchayat Election Result
संदीप क्षीरसागर

प्रतिक्रिया देताना संदिप क्षिरसागर, राष्ट्रवादीचे आमदार

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदिप क्षीरसागर आणि माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर या काका पुतण्यातील सत्ता संघर्ष ग्रामपंचायत निवडणुकीत देखील पाहावयास मिळाला (MLA Sandeep Kshirsagar won) आहे. नवगन राजुरी जिल्हा परिषद सर्कलमधील नवगण राजुरी या होमपीचवर माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाचा धुव्वा उडवत संदिप क्षीरसागर यांनी काकाला धोबीपछाड दिली आहे. या सर्कलमधील चार ग्रामपंचायत संदीप क्षीरसागर यांच्या ताब्यात आल्या (gram panchayat election 2022 result) आहेत.

जनशक्तीचा विजय : धन जनशक्ती विरुद्ध जनशक्तीमध्ये जनशक्तीचा विजय झाला आहे. मुंबईत राहून ग्रामपंचायत निवडणुका जिंकता येत नाहीत. त्याला जनतेत उतरावा लागते, असे म्हणत संदीप क्षीरसागर यांनी काकांना टोला लगावला आहे. राजुरी मतदारसंघातील पहिल्या फेरीत सर्वच ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्या आहेत. तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वात जास्त ग्रामपंचायत राष्ट्रवादीतील असा विश्वास आमदार संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला (gram panchayat election 2022 maharashtra result) आहे.



ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवला :गेल्या पाच सात वर्षांपासून संदिप क्षीरसागर आणि माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यातील सत्ता संघर्ष सगळ्या महाराष्ट्राने पाहिला आणि अभुवला (gram panchayat nikal) आहे. पाच वर्षापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार क्षीरसागरांनी नवगण राजुरीच्या ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकवला होता. त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा यावेळी त्यांनी केली. जयदत्त क्षीरसागर यांचे होमग्राउंड असणाऱ्या राजुरीमध्ये आमदार क्षीरसागर यांच्या पॅनलचा मोठा विजय झाला आहे. त्याचसोबत उमरद जहागीर, लिंबारुई, दगडी शहजाणपूर या ग्रामपंचायत देखील आमदार क्षीरसागर यांच्या ताब्यात आल्या (Gram Panchayat Election 2022) आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details