बीड - कोरोनाच्या बिकट काळात रुग्णांवर उपचार सुरू असताना ओरल रिहायड्रेटटिंग सोल्युशन (ओआरएस) बारामती ॲग्रोच्या माध्यमातून आमदार रोहित पवार यांनी दिले. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते बुधवारी (9 जून) बीड जिल्हा रुग्णालय येथे हे ओआरएस वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा रुग्णालय, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सूर्यकांत गीते हे उपस्थित होते. याची माहिती आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिली.
आमदार संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते वाटप
बीड जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात 5 हजार पेक्षा अधिक ओआरएसा पाठवून दिले. यामध्ये बीड जिल्हा रुग्णालय येथील रुग्ण व पोलीस अधीक्षक कार्यालय यांना हे ओआरएस वाटप करण्यात आले. बुधवारी जिल्हा रुग्णालय येथे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.