आष्टी (बीड) -राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आज आष्टी मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी अँटिजन टेस्ट केली. या टेस्टमध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, गेल्या चार दिवसांमध्ये जे माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी असे आवाहन अजबे यांनी केले आहे.
संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करावी
दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून सर्दी असल्याने, बाळासाहेब अजबे यांची त्यांच्या शिराळ येथील निवासस्थानी आरोग्य विभागाच्या वतीने टेस्ट करण्यात आली, या टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून, माझी तब्येत चांगली आहे. जे माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी असे आमदार बाळासाहेब अजबे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -स्कॉर्पिओ सापडण्यापासून वाझेंच्या अटकेपर्यंत, असा राहिला घटनाक्रम