महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

केज तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

केज तालुक्यातील एका गावात एक १७ वर्षीय मुलगी ही मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास शेतातून शौचाहुन परत येत होती. दरम्यान, नंदकिशोर गीते ह्याने हात धरून कापसाच्या शेतात नेऊन तोंड दाबून शेतात तिच्यावर जबरी अत्याचार केला. केज पोलीस ठाण्यात पीडित मुलीने दाखल केलेल्या तक्रारीवरून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.

केज तालुक्यातील घटना
केज तालुक्यातील घटना

By

Published : Oct 14, 2020, 12:00 PM IST

बीड - जिल्ह्यातील केज येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना मंगळवारी रात्री समोर आली आहे. शौचाहुन घरी परत जात असताना मुलीवर गावातील एका नराधमाने कापसाच्या शेतात नेऊन तोंड दाबून अत्याचार केल्याचे समोर आले असून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. नंदकिशोर कैलास गीते आरोपीचे नाव आहे.

केज तालुक्यातील एका गावात एक १७ वर्षीय मुलगी ही मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास शेतातून शौचाहुन परत येत होती. दरम्यान, नंदकिशोर गीते ह्याने हात धरून कापसाच्या शेतात नेऊन तोंड दाबून शेतात तिच्यावर जबरी अत्याचार केला. पीडित मुलीने आरडाओरड केली, परंतु जवळ कोणी नसल्यामुळे तिची सुटका झाली नाही. नंदकिशोर गीते याने पीडित मुलीस हा प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडित मुलीने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. परंतु भीतीपोटी आईने तो प्रकार पीडित मुलीच्या वडीलास सांगितला नाही.

यापूर्वी अनेकवेळा नंदकिशोर गीते हा पीडित मुलीला इशारे करून तिची छेडछाड काढत होता. परंतु भीतीपोटी बदनामी होईल म्हणून मुलीने हा प्रकार आतापर्यंत घरी सांगितला नव्हता. नंतर त्रास असह्य होऊ लागल्याने मुलीने हा प्रकार तिच्या वडिलांना सांगितला. त्यानंतर केज पोलीस ठाण्यात पीडित मुलीने दाखल केलेल्या तक्रारीवरून गीते याच्या विरोधात विविध कलमांसह बाललैंगिक अन्याय अत्याचार कायदा कलम ४, ६, ८, १० नुसार गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी नंदकीशोर गीते यास ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे हे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा -गूढ आवाजाने परिसर हादरला; केज तालुक्यातील केकानवाडी येथील प्रकार

ABOUT THE AUTHOR

...view details