महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गेवराईमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपी फरार - आरोपी फरार

नागझरी येथील एका अल्पवयीन मुलीला मारहाण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. यामधील पाचही आरोपी सध्या फरार आहेत. याबाबत गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेवराईमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By

Published : Jun 26, 2019, 12:33 PM IST

बीड - जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील नागझरी येथील एका अल्पवयीन १७ वर्षीय पीडित मुलीला जबर मारहाण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. याबाबत गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील पाचही आरोपी फरार आहेत.

गेवराईमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार
गेवराई पोलीस स्टेशनमध्ये पीडित मुलींनी जबाब दिला असून, या घटनेची गंभीर दखल घेऊन पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी बीड येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. नारायण भारत पवार, शहादेव विश्वास चव्हाण, जावेद विश्वास चव्हाण, पप्पु भारत चव्हाण, देवगण विश्वास चव्हाण (सर्व रा. नागझरी ता. गेवराई. जि.बीड) येथील रहिवासी असून ते फरार आहेत. लैंगिक अत्याचार सुधारित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बडे यांचा मार्गदर्शनखाली पोलीस उपनिरीक्षक कुंंभार हे तपास करत आहेत. याप्रकरणात एकही आरोपी अटक नसून सर्वजण फरार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details