महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीडमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा स्वत:हून ठाण्यात - अल्पवयीन मुलीचे अपहरण प्रकरण

दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला पळवून नेणारा अल्पवयीन मुलगा मध्यरात्री स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला.

बीड शहर पोलीस ठाणे

By

Published : Sep 6, 2019, 5:14 PM IST

बीड -दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या 15 वर्षीय विद्यार्थिनीला एका अल्पवयीन मुलाने पळवून नेले होते. मात्र, हा मुलगा विद्यार्थिनीसह बुधवारी मध्यरात्री स्वत:हून शहर पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यानंतर पोलिसांनी विद्यार्थिनीला नातेवाईकांच्या ताब्यात दिले असून त्या मुलाला ताब्यात घेतले आहे.

बीड शहर पोलीस ठाणे

हेही वाचा -शिर्डी नगरसेवक अपहरण प्रकरण: ३ आरोपी गजाआड, १ जण फरार

शहरातील दहावीत शिक्षण घेत असलेली मुलगी बुधवारी सकाळी 7 वाजता रिक्षातून शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडली. मात्र, ती शाळेत पोहोचलीच नाही. सकाळी पावणेबारा वाजता शिक्षकांनी पालकास फोन करुन मुलगी शाळेत कशी आली नाही? याबाबत विचारणा केली. त्यानंतर तिच्या वडिलांनी शाळेत धाव घेतली. सर्वत्र शोध घेऊनही ती आढळली नाही. दरम्यान, मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपीवर अपहरणाचा गुन्हा नोंद केला. याची कुणकुण लागल्यावर अपहरणकर्ता मुलगा विद्यार्थिनीसह बुधवारी मध्यरात्री शहर पोलिसांत हजर झाला. या घटनेचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details