बीड - येणाऱ्या काळात बीड जिल्हा विकासाच्या बाबतीत देशात प्रथम कसा येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वक्तव्य, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. बीड जिल्हा हा मागास म्हणून ओळखला जातो. येत्या काळात सर्वांच्या सहकार्याने जिल्ह्याची ही चुकीची ओळख पुसून टाकणार असल्याचेही ते म्हणाले.
'बीड जिल्हा देशात प्रथम आणण्यासाठी प्रयत्न करणार' - धनंजय मुंडेंचे बीडमध्ये जंगी स्वागत
येणाऱ्या काळात बीड जिल्हा विकासाच्या बाबतीत देशात प्रथम कसा येईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वक्तव्य, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केले.
मंत्रीपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर धनंजय मुंडे हे प्रथमच बीडमध्ये आले. यावेळी त्यांचे ढोल ताश्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. त्यानंतर जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयात विकासकामे व योजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी मुंडे बोलत होते. जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजना, दिवंगत गोपीनाथ मुंडे अपघात योजना, शेतकरी कर्जमाफी योजना, सिंचन प्रकल्प, पिक नुकसान भरपाई, वीजपुरवठा, रस्त्यांची अवस्था, रिक्त पदभरती, रेल्वे प्रकल्प, शाळा व महाविद्यालयांची अवस्था या सर्व विकासकामांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.