बीडChhagan Bhujbal: मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. मात्र ते आरक्षण ओबीसीमधून देऊ नका. वेगळं आरक्षण द्या. चुकीचं आरक्षण देऊ नका. चुकीचे पायंडे पाडू नका, असं प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी केले. बीड येथे आयोजित महाएल्गार मेळाव्यात ते बोलत होते. (State Govt)
तर लायकी का काढता?छगन भुजबळ म्हणाले, आज गोपीनाथ मुंडे असते तर हे सारे प्रश्न निर्माण झालेच नसते. आज गोपीनाथ मुंडे आपल्यात नाहीत आणि ओबीसींच्या मागे संकटांची मालिका सुरू आहे. बीडमध्ये विचारपूर्वक प्लान करून जाळपोळ, हिंसाचार झाला. जाती धर्माच्या पलीकडची बंधुता ही देशाची, महाराष्ट्राची परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता अन् आपल्याच लोकांची घरं फुंकता हे शोभतं का? असा सवाल भुजबळ यांनी केला. देशाला-राज्याला विचार, वारसा, दिशा देण्याचे काम ओबीसींनी केलं आहे. या देशाला संविधान बाबासाहेबांनी दिलं आहे. त्यांच्यामुळे आज देश एकसंघ आहे, तरी तुम्ही आमची लायकी काढता? असा प्रश्न भुजबळांनी विचारला.
तर जनता कायदा हातात घेईल:बीडमध्ये मोठमोठे नेते आहेत; पण आज एल्गार सभेसाठी आम्ही छोटे छोटे लोक आहोत. अनेक जण बहाणे सांगताहेत. समोरच्या लोकांना अनेकजण बोलावून मदत देताहेत. आमच्या विरोधात शक्ती देणाऱ्यांना आम्ही जागा दाखवून देऊ असा इशारा भुजबळांनी दिला. कोणाच्याही विरोधात काहीही बोलायचं, गलिच्छ बोलायचं, तोंड दिलयं म्हणून काहीही बोलता, एवढी मस्ती कुठून आली? आणि हे सर्व होत असताना मी शांतता बिघडवली असं म्हणता! जाळपोळ कोणी केली, मारहाण कोणी केली? अजुनही ओबीसींना मारहाण होत आहे. आता यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. पोलीस हात बांधून बसले तर जनता कायदा हातात घेईल असंही भुजबळ म्हणाले.