औरंगाबाद- जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोडांशी आलेला सोयाबीन कपाशीचा घास या पावसामुळे हिरावला गेल्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. मात्र, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांनी खचून जावू नये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पिकविम्यासह भरपाई देण्यासाठी राज्य शासन सरकार प्रयत्न करत आहे. असे आश्वासन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. तसेच अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाने ४८ तासाच्या आत पूर्ण करावे, असे आदेशही त्यांनी मंगळवारी दिले.
काळजी करु नका.. सरकार आपल्या पाठीशी; मंत्री देशमुखांचे शेतकऱ्यांना आश्वासन - पैठणमध्ये पीक नुकसानीची पाहणी
औरंगाबाद जिल्ह्यालाही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची मंत्री अमित देशमुख यांनी पाहणी केली. त्यावेळी त्यांनी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे असल्याचे सांगितले, तसेच झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेशही दिले.
![काळजी करु नका.. सरकार आपल्या पाठीशी; मंत्री देशमुखांचे शेतकऱ्यांना आश्वासन minister amit deshmukh](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9252371-thumbnail-3x2-aa.jpg)
मंत्री अमित देशमुख नुकसानीची माहिती घेताना
अमित देशमुख यांनी मंगळवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास पैठण तालुक्यातील मुरमा गावात अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत माजी मंत्री अनिल पटेल, काँग्रेसचे जिल्हाप्रमुख डॉ.कल्याणराव काळे, तालुकाप्रमुख विनोद पा.तांबे, प्रदेश काँग्रेसचे सचिव रवींद्र काळे, निमेश पटेल, उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे, तहसीलदार कल्याण शेळके जालना जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख आदी उपस्थित होते.
काळजी करु नका.. सरकार आपल्या पाठीशी
Last Updated : Oct 21, 2020, 7:42 AM IST