बीड- लॉकडाऊन सुरू झाले तसे बीडच्या व्यापाऱ्यांनी अन्नदानाचे काम हाती घेतले आहे. सलग दोन महिन्यांपासून व्यापाऱ्यांकडून अन्नदान सुरू आहे. बीडमधील वैष्णव देवी मंगल कार्यालयात स्वयंपाक बनवून शहरातील वेगवेगळ्या भागात गरजू भुकेलेल्यांना पोहोच केला जातो. यामध्ये दोन वेळचे जेवण अगदी वेळेत गरजूंपर्यंत पोहोचवले जाते.
या उपक्रमामध्ये व्यापारी स्वतः दिवसातील दोन-तीन तास स्वयंपाक कामात मदत करतात. सकाळी सहा वाजता स्वयंपाकाला सुरुवात केली जाते. यानंतर साधारणतः अकरा वाजेपर्यंत स्वयंपाक पूर्ण होऊन डबे पोहोच करण्याचे काम सुरू केले जाते. बीड शहरातील नागरिक संतोष सोहनी यांच्या मंगल कार्यालयात जेवणाचे डबे बनवण्याचे काम चालते.