महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परळी : माऊली मल्टीस्टेटमधील दीड कोटीच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी गजाआड - माऊली मल्टीस्टेट घोटाळा न्यूज

परळी शहरातील माऊली मल्टीस्टेटमध्ये झालेल्या दीड कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मुख्य आरोपीला औरंगाबादमधून अटक केली.

Mauli multistate 1.5 crore scam : main accused arrested
परळी : माऊली मल्टीस्टेटमधील दीड कोटीच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी गजाआड

By

Published : Jan 24, 2021, 9:56 AM IST

परळी वैजनाथ (बीड) - परळी शहरातील माऊली मल्टीस्टेटमध्ये दीड कोटींचा घोटाळा झाल्याचे प्रकरण समोर आले होते. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपी फरार होते. याप्रकरणी शनिवारी (ता. २३) आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांनी मुख्य आरोपीला औरंगाबादमधून अटक केली.

परळी शहरातील माऊली मल्टीस्टेटमध्ये अडीच कोटींचा घोटाळा झाला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. तपासामध्ये दीड कोटींचा घोटाळा असल्याचे समोर आले. या प्रकरणी ओम नारायण जैस्वाल (वय ५० रा. परळी), संगीता ओम जैस्वाल व विष्णू भागवत या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यातील मुख्य आरोपी ओम नारायण जैस्वाल यास औरंगाबाद येथील एमआयडीसी परिसरातून अटक करण्यात आली. तर विष्णू भागवत हा इतर गुन्ह्यात जेलमध्ये असून संगीता जैस्वाल ही, अद्यापही फरार आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लाजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांच्यासह आदींनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details