बीड: बीड जिल्ह्यात काही दिवसापूर्वी आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात बोगस भरती ( Massive bogus recruitment in health department ) झाल्याचे निदर्शनास आले होते. त्याच्यामध्ये अनेकांना अटकही झाली होती. यामध्ये मोठे अधिकारी सामील होते. मात्र हे प्रकरण थोडे शांत होते कि नाही तोच पुन्हा एकदा आरोग्य विभागात बोगस हंगामी फवारणी कर्मचारी बोगस प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी करीत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आरोग्य विभागाची प्रतिमा मलीन झाली आहे. ( bogus certificate )
Bogus certificate : आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात बोगस भरती; 50 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल - Massive bogus recruitment in health department
बोगस प्रमाणपत्राच्या ( bogus certificate ) आधारे नोकरी मिळवणाऱ्या 50 कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात आरोग्य विभागात बोगस प्रमाणपत्र ( Bogus certificate in health department ) देणारे मोठे रॅकेट उघड होणार आहे. उपसंचालकांनीच केला गुन्हा दाखल.

50 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल : हंगामी कर्मचारी असलेल्या बोगस प्रमाणपत्र सादर करून आरोग्य विभागात नोकरी मिळवण्याच्या प्रकरणात रविवारी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात 50 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यातच आरोग्य विभागातील पदासाठी हंगामी कर्मचारी आरक्षण आहे. बीड जिल्ह्यातील हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांचे बनावट प्रमाणपत्र देणारे रॅकेट असल्याच्या चर्चा खरी ठरली.
बोगस प्रमाणपत्र देणारे मोठे रॅकेट उघड होणार : उपसंचालक कार्यालयाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी ज्ञानदेव करवर यांनी शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली आहे. यामध्ये 2017 ते 2020 या कालावधीत हंगामी फवारणी कर्मचारी असल्याचे बोगस प्रमाणपत्र मिळवून आणि त्यांनी नोकरी मिळवण्याचे म्हटले आहे. या प्रकरणी सध्या आरोग्य विभागाच्या सेवेत असलेल्या 50 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये बोगस प्रमाणपत्र देणारे मोठे रॅकेट उघड होणार आहे. मात्र असे प्रमाणपत्र देणारे रॅकेट जिल्ह्यात कार्यरत असल्याचे वारंवार बोलले जात असताना आणि यात आरोग्य विभागातील काही लागेबांधे असल्याचे बोलले जात आहे. यावर आरोग्य विभाग मौन पाळून आहे. त्यामुळे आता हे रॅकेट शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.