Beed Crime : चारित्र्याचा संशय घेत विवाहितेची हत्या; पती, सासू, दीरासह नणंदवर गुन्हा दाखल - माजलगाव महिलेची हत्या
बीडमधील माजलगावमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेच्या चारित्र्यावर संशय घेत तिची हत्या करण्यात आली आहे, असा आरोप मृत महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या कुटुंबातीलच चार जणांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फाईल फोटो
By
Published : Mar 26, 2023, 8:23 PM IST
बीड - माजलगावमधील फुले नगर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात शनिवारी (25 मार्च) महिलेचा पती, सासू तसेच दिरासह चार जणांविरुद्ध कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पोलीस सखोल तपास करत आहेत. मृत महिलेच्या पतीला माजलगावमधील पोलिसांनी अटक केली आहे.
चारित्र्याच्या संशयावरून हत्या - महिलांच्या चारित्र्यावर संशय घेत तिची हत्या करण्यात येत असल्याच्या अनेक घटना सध्या समोर येत आहेत. अशीच एक घटना आता उघडकीस आली आहे. मृत बानोबी रफिक शेख हिचा विवाह शेख रफिक खलील याच्याशी झाला होता. पती – रफिक, सासू आरिफा, दिर रईस, नणंद सिमा यांनी संगनमत करून त्या महिलेची हत्या केली आहे. चारित्र्याचा संशय घेत वरील सर्वांनी महिलेची हत्या केली आहे, असा आरोप मृत महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे.
चार जणांवर गुन्हा दाखल - तू काळीच आहेस व तुला आई नाही. तसेच तुझ्यासोबत लग्न करून फसलो आहोत, अशा अनेक कारणाने आरोपी महिलेला छळत होते. तसेच तिला उपाशी ठेऊन शारीरिक व मानसिक त्रास हे सर्व आरोपी देत होते. 6 मार्च 2023 रोजी बानोबी हिच्या डोळ्यांवर आरोपींनी संगणमताने वार करुन तिची हत्या केली आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या माहेरकडील नातेवाईकांनी संशय व्यक्त केला होता. यावर माजलगाव येथील शहर पोलिसांनी मृत महिलेचा शवविच्छेदन अहवाल येताच, अहवालात डोक्याला, डोळ्याला मारले असल्याचे स्पष्ट झाले होते.
मृत महिलेच्या माहेरच्यांचा आरोप - मृत महिलेचा भाऊ सय्यद तारेख अब्दुलमन्नान यांच्या तक्रारीवरून शनिवारी (25 मार्च) पती, सासू, दिर, नणंद यांच्याविरुद्ध कलम 302. 498 (A), 323, 504, 34 भादंवि नुसार माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेचा अधिक तपास पीआय शितलकुमार बल्लाळ करत आहेत. मृत महिलेच्या पतीला शहर पोलिसांनी लगेच अटकदेखील केली आहे.