महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अंबाजोगाईत निवासी डॉक्टरांचे लक्षवेधी आंदोलन - अंबाजोगाई निवासी डॉक्टर्स

निवासी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेने स्वा. रा. ती. रुग्णालयाच्या बाह्यरूग्ण कक्षासमोर लक्षवेधी आंदोलन केले. यावेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन आंदोलकांनी अधिष्ठाता यांना दिले.

अंबाजोगाईत निवासी डॉक्टरांचे लक्षवेधी आंदोलन
अंबाजोगाईत निवासी डॉक्टरांचे लक्षवेधी आंदोलन

By

Published : Apr 18, 2021, 7:39 AM IST

अंबाजोगाई :रुग्णसेवेसाठी डॉक्टरांची संख्या वाढवा आणि निवासी डॉक्टरांवरील रुग्णसेवेचा ताण कमी करा यासह विविध मागण्यांसाठी शनिवारी सकाळी निवासी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेने स्वा. रा. ती. रुग्णालयाच्या बाह्यरूग्ण कक्षासमोर लक्षवेधी आंदोलन केले. यावेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन आंदोलकांनी अधिष्ठाता यांना दिले.

गेल्या वर्षभरापासून निवासी डॉक्टर मोठ्या प्रमाणात कोरोना कक्षात कार्यरत आहेत. निवासी डॉक्टरांना त्यांच्या तज्ञ विषयांचा अभ्यासही महत्त्वपूर्ण असतो. अशा स्थितीतही हे डॉक्टर सेवा देत आहेत. त्यामुळे तज्ञ विषयांच्या अभ्यासक्रमाकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. या संदर्भात मार्ड या संघटनेने वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधले तरीही प्रशासनाच्या वतीने दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी सकाळी लक्षवेधी आंदोलन छेडण्यात आले.

कोविड विशेष डॉक्टर्स म्हणून रुग्णालयात मनुष्यबळ वाढवा. डॉक्टरांना देण्यात येणारे पीपीई कीट व एन-९५ मास्क उत्तम प्रतिचे द्या. कोरोना कक्षात ड्युटी देताना सर्व विभागात सातत्य ठेवा. सुरक्षा रक्षकांची वाढ करा. रुग्णालयातील रिक्त पदे तत्काळ भरा. अशा विविध मागण्या प्रशासनाकडे मांडण्यात आल्या. या आंदोलनाचे नेतृत्व मार्डचे अध्यक्ष डॉ. केदारनाथ कुटे, कार्याध्यक्ष सुमीत साबळे, सचिव डॉ. विद्या लवंदे यांनी केले. यावेळी निवासी डॉक्टर मोठ्या संख्येने या लक्षवेधी आंदोलनात सहभागी झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details