महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maratha Protest Beed Curfew : मराठा आंदोलक आक्रमक; बीडमध्ये संचारबंदी लागू

Maratha Protest Beed Curfew : राज्यात मराठा आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं उपोषण सहाव्या दिवशी सुरुच आहे. सध्या त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांनी उपचार घेण्यासही नकार दिलाय. बीडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले होते. त्यामुळं बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आलीये. जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे (Deepa Mudhol Munde) यांनी याबाबत आदेश जारी केलाय.

Beed Curfew
बीडमध्ये संचारबंदी लागू

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 30, 2023, 9:13 PM IST

Updated : Oct 30, 2023, 10:06 PM IST

बीडमध्ये संचारबंदी लागू

बीड Maratha Protest Beed Curfew : बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी संचारबंदी लागू केली आहे. बीड शहरात सोमवारी दिवसभरात घडलेल्या आंदोलन आणि विघातक घटनेमुळं रविवारी (30 ऑक्टोबर) रात्रीपासून पुढील अनिश्चित काळापर्यंत ही संचारबंदी लागू करण्यात आलीये. बीड शहर तसेच तालुका मुख्यालयापासून पाच किलोमीटर अंतरापर्यंतच्या परिसरामध्ये संचारबंदी आदेश म्हणजे कलम 144 बीडच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे (Deepa Mudhol Munde) यांच्या आदेशानं लागू केले आहेत. तर बीडमध्ये सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचं मोठं नुकसान होत असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय.

ठिकठिकाणी रास्ता रोको : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू झालेल्या आंदोलनानं आता हिंसक रुप घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय. बीड जिल्ह्यामध्ये परळी-बीड त्यासोबतच धुळे-सोलापूर महामार्गावरसुद्धा आंदोलन करत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. कल्याण विशाखापटनम महामार्गावर तालखेड फाटा येथे मराठा समाज आंदोलन करत असून, रस्त्यावर टायर जाळून निषेध व्यक्त केला जातोय. त्यामुळं या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

संदीप क्षीरसागर यांचं घर पेटवलं : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलनानं सोमवारी राज्यात पेट घेतलाय. मराठवाड्याच्या अनेक भागात आंदोलकांनी जाळपोळ केली. त्यानंतर आंदोलकांच्या निशाण्यावर राजकीय नेते आले आहेत. सोमवारी सकाळी आंदोलकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचं घर पेटवलं होतं. मात्र, हे सर्व मराठा आंदोलकच आहेत का याबाबतची अधिकृत माहिती नाही. आंदोलकांनी त्यांच्या घरावर तुफान दगडफेकही केली. त्यानंतर बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आणखी एक आमदार संदीप क्षीरसागर यांच्या राहत्या घरावर आंदोलकांनी हल्ला केलाय. त्यांनी संदीप क्षीरसागर यांचं घर पेटवलं. तसेच माजी आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या ऑफीसलाही आग लावली. मात्र, हे सर्व आंदोलक हे मराठा समाजाचेच होते का? याबाबत स्पष्टता आलेली नाही.

Last Updated : Oct 30, 2023, 10:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details